Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोला प्राधान्य

Author: Share:

२०१८-१९ च्या एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. एकूण सात प्रकल्पांसाठी ४ हजार ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यांनतर सर्वाधिक म्हणजे २१०० कोटींचा निधी शिवडी-न्हावाशेवा ट्रानसहार्बर लिंकसाठी उपल्बध करण्यात आला आहे. तसेच मेट्रोच्या प्रकल्पात जे हात राबत आहेत, त्या कामगारांसाठी कल्याण निधी उभारला जाणार आहे.

शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केल्याने या प्रकल्पाला या वर्षी वेग प्राप्त होईल, असा विश्वास आहे. सात पैकी दोन मेट्रो मार्गांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. डि. एन. नगर ते दहिसर या मार्गासाठी १५८८ कोटी तसेच अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गासाठी १२६२ कोटी रुपये देण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पाचं काम सध्या सुरु आहे. गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचा अर्थसंकल्प मांडला, यात मंजूरी देण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाच्या कामगारांसाठी कामगार कल्याण निधी उभारण्याचा निर्णय घेतला गेला. कामाच्या ठिकाणी कामगारांना होणारी शारिरीक इजा, होणाऱ्या दुर्घटना या सर्वांची माहीती देणे, माहिती देण्यास विलंब केल्यास वा माहिती लपविल्यास, कंत्राटदारांना जो  दंड आकरण्यात येतो. त्या दंडाच्या रकमेतून निधी उभारला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगारास काही इजा झाल्यास त्याच्या कुटुंबाला भरपाई मिळावी यासाठी हे धोरण तयार केले जाईल, असे एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले.

कोणकोणत्या प्रकल्पांसाठी किती निधी

मेट्रो प्रकल्प

दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द डी.एन नगर अंधेरी ते दहिसर. मेट्रो २अ -१५८८ कोटी.

डी.एन.नगर ते मंडाळे. मेट्रो २ ब – ७०० कोटी.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ. मेट्रो ३ – ५०० कोटी.

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली. मेट्रो ४- ४५० कोटी.

ठाणे-भिवंडी-कल्याण. मेट्रो ५ -१०० कोटी.

कांजूरमार्ग समर्थ नगर – जेव्हीएलआर- सीप्झ-कांजूरमार्ग- विक्रोळी – १०० कोटी

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व. मेट्रो ७ अ – १२६२ कोटी.

शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक -२१०० कोटी.

मोनो रेल – २१६ कोटी

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प एमयुटीपी -६१ कोटी.

विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प ( विस्तारीत एमयुटीपी ) १२९० कोटी.

प्रादेशिक स्तरावर जसस्त्रोताचा विकास – सूर्या प्रकल्प – ५८१ कोटी.

महानगर क्षेत्रातील रस्ते सुधारणा – ५० कोटी.

वांद्रे-कुर्ला संकूल विकास – ८२.६५ कोटी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक -१५० कोटी.

मिठी नदी विकास -२० कोटी.

पायाभूत सुविधांसह महानगर क्षेत्रात भाडेतत्वावर घरबांधणी -१६२.६५ कोटी.

सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तार तसेच वांद्रे- कुर्ला संकूल ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर एलिव्हेटेड मार्ग -१८० कोटी.

पूर्व द्रुतगती महामार्गावर छेडानगर जंक्शन, घाटकोपर पूर्व येथे एलिव्हेटेड मार्गाची सुधारणा – ७० कोटी.

पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाची देखभाल व दुरुस्ती – १२६ कोटी.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प एमयुटीपी २ – ५०० कोटी.

इतर प्रकल्प – ७५९.८५ कोटी.

एकूण कर्ज – १३१.५५ कोटी.

अनुदाने – २९९.२५ कोटी.

इतर खर्च – ६७५. ५० कोटी.

एकूण खर्च १२,१५६,९५ कोटी.

Previous Article

तुमची माहिती जपून ठेवा: सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी?

Next Article

“हॉर्न नको” यासाठी आज विशेष क्रिकेट सामना

You may also like