माझी(च) मानसिकता

Author: Share:

माझी मानसिकता बदलणे मलाच का शक्य होत नाही (?)
तिच्या गोऱ्या उघड्या मांड्या बघून का विसरून जातो मी तिचं बालपण,

बहिणीचं स्वातंत्र्य हिसकवणारा मीच
आणि दुसऱ्याच्या आया बहिणींना बघुन
मनातल्या मनात त्यांची अब्रू लूटणारा सुद्धा मीच(?)

जाते जेव्हा ती माझ्या समोरून तेव्हा तिच्या उघड्या मांड्याना
ती जाई पर्यंत एकटक बघणारा सुद्धा मीच,
आणि ती गेल्यावर तिच्या ह्या नग्नपणाला नाव ठेवणारा सुद्धा मीच (?)

सोशल मीडियावर तिच्याबद्दलचे सहानुभूतीचे भाष्य करून
स्वतःची हवा करणारा मीच
आणि तिलाच गुगलवर नग्न बघणारा सुद्धा मीच (?)

त्यांनी पुरेशे कपडे घातले पाहिजे हा अट्टाहास करण्यापेक्षा
मी माझ्या विचारांना का पुरेशे कपडे घालत नाही ?
ते जास्त विवस्त्र आहेत याची जाणीव का होत नाही?

माझी मानसिकता बदलणे मलाच का शक्य होत नाही (?)

@अक्षय गमे


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

पुस्तक दिन

Next Article

तीन भारतीय…

You may also like