Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

तेव्हा मी X आता मी

Author: Share:

मला पाहिजे होती दिक्षितांची माधुरी

राहिली ती कहाणी माझी अधुरी

ऐश्वर्या ची देखिल होती मला आशा

तिने देखिल केली माझी निराशा

मी होतो तेव्हा रजनीकांत

आता नुसताच मी शांत शांत

मी होतो तेव्हा शाहरुख

आता नुसतीच मनात रुख रुख

मी राखत होतो तेव्हा हिप्पी

अर्ध्या डोक्याची झाली आता माझ्या चंपी

तेव्हा चाले मी फार ऐटीत

आता बसतो घुडगे मी टेकित

तेव्हा होतो ऐकटा मी सदाशिव

आता बायको खाये माझा जीव

तेव्हा पाहत होतो सदाच मी सिनमे

आता पाहतो घरातली मी कामे

तेव्हा होतो ऐन मी जवानीत

आता बसे काकाच्या मी पंक्तीत

तेव्हा चाले माझाच करिश्मा

आता डोळ्याला लागलाय माझ्या चष्मा

तेव्हा नसे खर्चाचा माझा ताळेबंद

आता हिशोबाचा जडलाय मला छंद

तेव्हा होतो अगदी मी सडपातळ

आता पोटाचा सुटलाय माझा नळ

तेव्हा फिरे मी अगदी मोकाट

आता काम मोडी माझे पेकाट

तेव्हा येई माझ्या स्वप्नात राणी

आता झोपतो  मी भरुणी घरचे पाणी

तेव्हा गाई मी  प्रेमाची मधुर गाणी

आता धावतोय मी  कमवायला नाणी

तेव्हा  सारी दुनिया वाटे प्यारी प्यारी

आता झालो मी पक्का संसारी

आता झालो मी पक्का संसारी

 

महेश रायखेलकर

Previous Article

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण; भाग १

Next Article

डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रस्तुत; मराठी लावण्यांचा भव्य कार्यक्रम

You may also like