Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गणित होणार सोपे 

Author: Share:

महापालिकेच्या शिक्षण विभागाने नवीन पाऊल उचलले आहे.  महापालिका शाळांमधील मुलांना गणित विषय सोप्यारीतीने शिकवण्यासाठी गणितपेटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविण्यासाठी त्या पेटीचा  वापर होणार आहे.

एकूण १५९० गणितपेट्या खरेदी केल्या जाणार आहेत. या गणितपेटीत मणी माळ एकक, दशक दांडे, शतक पाटी व हजाराचा घन, नाणी आणि नोटांची पुस्तिका, ठोकळे जोडणे, मॅचिंग सेट, गणितीय जाळी, संख्या कार्ड, जीओ बोर्ड, मीटर टेप, पट्ट्या, मणी, दोरी केसांच्या पिन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.

त्यासाठी ८१ लाख ८८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे. अर्थसंकल्पात महापालिका प्रशासनाने कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून हा खर्च होणार आहे. गणितपेटीची खरेदी निविदा मागवून केली जाणार आहे.

Previous Article

इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंतिम तारीख : ५ सप्टेंबर

Next Article

१७ ऑगस्ट

You may also like