मार्टिन ल्युथर किंग

Author: Share:

जन्म १५ जानेवारी १९२९

स्मृतिदिन: ४ एप्रिल १९६८

अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचे प्रणेते आणि  नागरी हक्क समानतेचा कट्टर पुरस्कर्ते, मार्टिन ल्युथर किंग, जगातील आदरणीय व्यक्तींमधील एक नाव आहे. किंग गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते आणि त्यांनी अहिंसा व नि:शस्त्र प्रतिकार यांचा वापर करूनच आपली वर्णद्वेषविरोधी चळवळ लढली. या अर्थाने, भारतीयांशी त्यांचे वैचारिक नाते होते.

ॲटलांटा या गावी त्यांचा १५ जानेवारी ला जन्म झाला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते १९४८ मध्ये पदवीधर झाले. बॉस्टन विद्यापीठाने १९५५ मध्ये त्यांना पीएच्.डी.  पदवी दिली.  क्रोझर येथे असताना गांधींच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा किंग यांचेवर विलक्षण प्रभाव पडला.

मंगमरी खेड्यात किंग आपल्या वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक बनले. डिसेंबर १९५५ मध्ये स्थानिक वाहतूक कंपनीच्या निग्रोंना वाहनांमध्ये गोऱ्या लोकांच्या शेजारी बसू न देण्याच्या धोरणाविरुद्ध सुरू झालेल्या अहिंसात्मक चळवळीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ती चळवळ यशस्वी झाली आणि किंगच्या आयुष्यास कलाटणी मिळाली.

२८ ऑगस्ट १९६३ रोजी त्यांनी आयोजित केलेल्या वॉशिंग्टनच्या मोर्च्यात, २,५०,००० लोकांनी भाग घेतला होता. त्यावेळी केलेल्या संस्मरणीय भाषणात त्यांनी श्वेतवर्णीयांना पूर्वग्रह व विलग्नीकरण दूर करण्याबद्दल आणि निग्रोंना समानतेने वागविण्याबद्दल आवाहन केले.

अमेरिकेच्या सामाजिक दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या या महान कामगिरीबद्दल वयाच्या पस्तीसाव्या वर्षी १९६४ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.

मार्टिन ल्युथर यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी स्ट्राइड टोअर्ड फ्रीडम(१९५८), स्ट्रेंग्थ टू लव्ह (१९६३), व्हाय वुई कांट वेट (१९६४), व्हेअर डू वुई गो फ्रॉम हीअर (१९६७), द ट्रंपेट ऑफ कॉन्शन्स (१९६८), आय हॅव्ह ए ड्रीम (१९६८) ही महत्त्वाची होत.

१९६८ मध्ये ‘प्युअर पीपल्स कॅंपेन’ वॉशिंग्टन येथे भरविण्याची त्याने ठरविले होते. परंतु त्यापूर्वीच ४ एप्रिल १९६८ रोजी त्याचा रेम्स् अल् रे या श्वेतवर्णीय इसमाने बंदुकीने गोळी घालून खून केला.

संदर्भ: मराठी विश्वकोष

 

“I have a Dream” :मार्टिन ल्युथर किंग यांचे गाजलेले भाषण

 

Previous Article

सुटीत मुलांना वाचतं करण्यासाठी आणि सर्जनशील बनविण्यासाठी ‘मसापचा’ पुढाकार

Next Article

४ एप्रिल 

You may also like