आमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा झुकरबर्गचा माफीनामा

Author: Share:

सोशल मिडियातील आघाडीवर फेसबुकच्या विश्वासाह्रतेला तडा पोहचला आहे. फेसबुकवरुन माहीती गहाळ होणं ही चूक होती, अशी कबुली मार्क झुकरबर्गने दिली. आपल्या फेसबुक अकांऊटवरुन मार्कने सविस्तर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.

फेसबुक युझर्सची माहिती कशाप्रकारे गहाळ झाली. नेमकी काय चुक झाली, याचा शोध घेऊ. भविष्यात अश्या चुका होणार नाहीत, अशी ग्वाही मार्कने दिली आहे. फेसबुकचा वापर हा अधिकाधिक मजेशीर व्हावा, त्यावर वेगवेगळ्या गोष्टी युझर्सना मिळाव्यात यासाठी फेसबुक वेगवेगळ्या कंपन्यांना फेसबुकमध्ये परवानगी देतं. मात्र अशाच अॅप्स आणि कंपन्यांनमधून युझर्सची वैयक्तिक माहिती गहाळ होत आहे. यामुळे फेसबुकवर एखाद्या अॅपचा वापर करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.

नक्की प्रकरण काय आहे ?

२०१७ साली अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटीका या कंपनीने जवळपास ५ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरुन त्याचा उपयोग निवडणूकीसाठी केला गेला. असा आरोप आहे.

काय काळजी घ्याल ?

आपण फेसबुकवर काहीवेळेस अनावश्यक असलेल्या पोस्टसुद्धा शेयर करत असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट टाकत असतो. यासाठी गरज नसलेल्या पोस्ट शेयर करु नये. दरवेळेस अकाउंट लॉग-आउट करावं.

 

Previous Article

मनाच्या खिडकीतून !

Next Article

लिंगायतांनो ,तुम्ही दूर जात आहात का ? : अरविंद विठ्ठल कुळकर्णी

You may also like