प्राचीन भारतीय ज्ञानापासून सायबर सिक्युरिटीपर्यंत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावोस मधील भाषणाचा स्वैर अनुवाद  

Author: Share:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वित्झर्लंडमधील  दावोस मध्ये ४८व्या जागतिक अर्थ परिषदेसमोर दीर्घ भाषण केले. भाषण संपूर्ण हिंदीत केले, आणि त्यात प्राचीन भारतीय ज्ञानापासून सायबर सिक्युरिटीपर्यंत आणि एफडीआय पासून क्लायमेट चेंज पर्यंत अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला.

“भारतीय पंतप्रधान याआधी १९९७ मध्ये आले होते त्यावेळी भारताचा जीडीपी ४०० बिलियन डॉलर होता आता तो सहापट वाढला आहे. त्यावेळी या फोरमचा विषय नेटवर्किंग सोसायटी होता. आज माहिती तंत्रज्ञानाचा प्रवास पाहता तो विषय वर्षे जुना असावा असे वाटते. १९९७ आणि आजमध्ये किती बदल झाला आहे हे सांगताना तेंव्हा गुगलचे नाव सुद्धा नव्हते, इंटरनेट वर अमेझॉन टाकलेत तर जंगले आणि नद्या आल्या असत्या, हॅरी पॉटर कुणाला माहित नव्हता, बुद्धिबळपटूंना काँप्युटर पासून हरण्याची भीती नव्हती, ट्विट फक्त चिमण्या करायच्या, आज दोन दशकांनंतर आमचा समाज खूप जटिल नेटवर्क जाहले आहे. त्यावेलीही दावोस काळापेक्षा पुढे  होता आणि आजही आहे. या वर्षी फोरम चा विषय “दरारे पडलेल्या जगात भविष्यासाठी साहचर्य” (शेअर्ड फ्युचर इन फ्रॅक्चर्ड वर्ल्ड) हा आहे. नवीन क्षमतांचा विकास होतो आहे, दूरगामी बदल दिसत आहेत, आणि नवीन समस्या निर्माण होत आहेत.”

“माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांनी जगाला प्रभावित केले आहे, अर्थव्यवस्थेपासून राजकीय व्यवस्थेपर्यंत आणि आर्थिक व्यवस्थेपर्यन्त सर्व काही ह्या तंत्रज्ञानाने प्रभावित जाहले आहे. सोशल मीडिया हा तंत्रज्ञानाने कसे जोडले आणि तोडले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे. आज डेटा ही मोठी संपदा आहे. त्याच्या जागतिक प्रवाहाने संधीसुद्धा दिसते आणि समस्यांतही तयार होत आहे. ज्याचे ह्या डेटावर नियंत्रण असेल त्याचेच भविष्यावर वर्चस्व आहे. सायबर सिक्युरिटी आणि न्यूक्लिअर सेफ्टी च्या जगात सुद्धा नवीन समस्या आणि जुन्या समस्या अधिक गंभीर होत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाने भविष्य निर्माण होते आहे पण काही भिंती उभ्या राहत आहेत, त्यामुळे मानवतेसमोर शांतीचा रस्ता कठीण होत आहे. फ्रॅक्चर्ड, डिव्हाइड आणि बॅरिअर्स म्हणजे संधींचा अभाव, आणि प्राकृतिक आणि तांत्रिक संसाधनांवर अधिपत्य मिळवणे आहे. यामुळे आमच्या समोर मानवतेसमोर अनेक प्रश्न आहेत ज्याचे भावी पिढ्या उत्तर मागत आहे. साहचर्यावर संघर्ष हावी होत आहे. त्यामुळे आमच्याकडे अशी कोणती साधने आहेत ज्यामुळे आपण या दुराव्याला आणि चिरांना मिटवून साहचार्याचे भविष्य घडवू शकतो.”

“भारतात अनादी काळापासून आमचा इतिहासाने, इतिहासातील विचारवंतांनी संस्कृती आणि माणसे जोडण्यावर विश्वास ठेवला आहे. वसुधैव कुटूंबकम, म्हणजे हे जागाच आमचे कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम चे हे तत्व या दुराव्याला आणि चिरांना मिटवण्यासाठी महत्व आहे. मात्र यासाठी कुटुंबात संवाद आणि सहमती असणे आवश्यक आहे. कुटुंबात जसे काही भांडणे असू शकतात, पण जेंव्हा समस्या पुढे येतात तेंव्हा सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. मात्र आमची चिंता अशी आहे, कि आमच्यातील बेबनावामुळे ह्या समस्यांपुढील आमचा संघर्ष अधिक कठीण बनला आहे, आणि या समस्यांची संख्या आणि विस्तार व्यापक आहे.”

“मी तीन मुख्य समस्यांचा उल्लेख करेन जे मानवतेसमोर खूप मोठे धोके उभे करीत आहेत. पहिला धोका क्लायमेट चेंज चा आहे. हिम वितळत आहे, बेटे बुडत आहेत, बुडण्याच्या बेतात आहेत. खूप पाऊस, खूप उष्णता, खूप थंडी, पर्यावरणातील हे टोकाचे बदल धोके आहेत. यावेळी आम्ही वास्तविक एकत्र येऊन या समस्येवर उपाय काढला पाहिजे होता. पण आपण एकत्र आलो नाही . प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण काय करू शकतो. असे किती देश आहेत जे विकसनशील देशांना उत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”

“आमची संस्कृती आमचे संस्कार माणूस आणि प्रकृतीच्या संबंधाविषयी बोलतात. हजारो वर्षांपूर्वी “भूमी माता पुत्रो अहं पृथ्व्याम”, आम्ही जर या पृथ्वीची मुले आहोत, तर आज प्रकृती आणि माणसामध्ये हे भांडण का चालू आहे.ईशावास्योपनिषदात आमच्या गुरूंनी शिष्यांना परिवर्तनशील भविष्याचे सूत्र दिले होते, की जगात राहताना, त्याचा निष्काम भावनेने उपभोग घ्या. दीड हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी अपरिग्रह ह्या सूत्रात आवश्यकता असेल तेवढाच वापर करण्याचे सांगितले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सुद्धा ट्रस्टीशिप ह्या आपल्या तत्वात गरज असेल तेवढेच उपभोग करा, लालसेने नको हेच तत्व सांगितले. त्यागपूर्वक भोगापासून आपण लालसेने खाली खाली घसरत पर्यावरणाच्या शोषणापर्यंत पोहोचलो आहोत. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपला विकास होत आहे कि अध:पतन. याच दर्शनातून आलेल्या योग आणि आयुर्वेदाने आपल्याला हाय फ्रॅक्चर्ड सोसायटीला सुधारणायची शकतो मिळेल.”

“आम्ही भारतात २०२२ पर्यंत १७५ गिगाव्होट एवढी सौरऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. मागील तीन वर्षात आम्ही १/३ उद्दिष्टय आम्ही पूर्ण केले आहे. २०१६ मध्ये भारत आणि फ्रांस ने एक नवीन करार केला, हा प्रयत्न इंटरनॅशनल सोलर अलायन्स ची निर्मिती झाली ज्याची पहिली समिट मार्च २०१८ मध्ये दिल्ली मध्ये होईल. दुसरा धोका आहे, दहशतवाद. तुम्ही सर्व ह्या धोक्यांशी परिचित आहात. ह्यातील तीन मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले. एक सुशिक्षित तरुण दहशतवाद्यांकडे आकर्षित होत आहेत, दुसरे जगातील अनेक देश संकुचित होत आहेत. प्रत्येक जण इंटरकनेक्टेड जगाची गोष्ट करतो, पण वास्तविक त्याचे आयाम संकुचित आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर बनलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आजच्या काळातील माणसाचं स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुरेशा आहेत का? विकसित आणि विकसनशील देशांमधील महत्वाकांक्षा वेगवेगळ्या आहेत. काही देश जागतिकीकरणापासून दूर जाणायचा प्रयत्न करत आहेत. यामुळे आंतरदेशीय आर्थिक व्यवहार कमी झाले आहेत. यासाठी बदलत्या जगासाठी लवचिक योजना बनल्या पाहिजेत. महात्मा गांधीं सांगितले होते, मला असे वाटत नाही कीं माझ्या घरातील दरवाजे आणि खिडक्या बंद असाव्यात. सर्व देशातील विचारांचे वारे माझ्या घरात खेळले पाहिजेत. यावरच आधारित भारत सर्व जगातील विचारांचे स्वागत करीत आहेत.”

“लोकतंत्र भारतात एक विचारदर्शन आहे. लोकशाही भारत विविधतेचे आणि भारतीयांच्या एकात्मिक विकासासाठी एक मार्ग दाखवतो. लोकशाही मूल्ये आणि समावेशक आर्थिक विकास दुभंगलेल्या मनांना जोडण्याचे काम करतो. भारतने नेहमीच, प्राचीन काळापासून सहकार्याचा हात पुढे केला आहे, संघर्षाला सामोरे जाताना सह्कार्याचं भूमिकेत राहिला आहे, मग शांती आणि मानवतेचं आदर्शांची दुसऱ्या महायुद्धानंतर असू दे, किंवा युनोच्या शांतिसेनेतील भारताचे योगदान असू दे किंवा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळेस, शेजारी राष्ट्रांना मदत करणे यातून भारताची सहकार्य करण्याची भावना दिसते.”

हे बोलताना, आपल्या सरकारचे गुणगान तिथेही गायला पंतप्रधान कचरले नाहीत आणि साडे तीन वर्षात आम्ही काय केले ह्याचेही गुणगान ते गायले. २०१४ मध्ये आम्हाला भारतीयांनी तीस वर्षात पहिल्यांदा पूर्ण बहुमताने निवडून दिले, माझ्या सरकारचे सूत्र सबका साथ सबका विकासआहे, माझ्या सरकारच्या प्रत्येक नीती आणि योजनाचा आधार सर्वसमावेशकता आहे  हे सांगताना आपल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, बेटी बचाओ अभियान, जनधन योजना ह्या योजनांचा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत.  ह्यामुळेच भारतात पर्यटन करणे, उत्पादन करणे, भरातून निर्यात करणे पहिल्यापेक्षा अधिक सोप्पे झाले आहे. आम्ही लायसन्स परमिट राजला नाहीसे केले आहे, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक येते आहे, शेकडो योजना केंद्र आणि राज्य शासनाने केल्या आहेत, तीन वर्षांमध्ये आम्ही १४०० किचकट कायदे बदलले आहेत, पहिल्यांदा भारतात जीएसटी लागू केले आहे, तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत, भारताला बदलण्यासाठी आमच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. प्रत्येक निवडणुकीमागे आम्हाला निवडून देऊन आमच्या योजनांवर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे, असे सांगायलाही ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विसरले नाहीत.

“भारतीयांच्या आशा अपेक्षा आणि पुरुषार्थाचे गाणे तुमच्यासमोर गाण्यासाठी मी येथे आलो आहे. आज तरुण भारतीय २०२५ मध्ये ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत, आज ते नोकरी घेणारे नाही नोकरी देणारे बनले आहेत आणि तुमचे स्वागत करण्यासाठी ते सज्ज आहेत. जगाला बदलांसाठी सूचना देताना, त्यांनी लोकशाही तत्वाला अजून प्रोत्साहन देणे, जागतिक संस्थांना अधिक बळकट करणे, नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय संघटनांचे पालन करणे आणि जागतिक आर्थिक वाढीत वेग आणणे ह्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कधीही भौगोलिक सहभागपूर्ण सहअस्तित्व असल्याने आम्ही मल्टीपोलार मल्टीकल्चर वैसीव्हिक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. सहयोग आणि संवादांनी सर्व भांडणे मिटवली जाऊ शकतात. शांती आणि स्थिरता आणि विकासासाठी भारताचा हा अनुभवपूर्ण उपाय आहे. देशासाठी नाही जगासाठी आमच्या प्राचीन विचारवंतांनी सर्वेपि सुखिनः संतु न कश्चित दुःखम आप्नुयात, म्हणजे सर्व सुखी आनंदी असोत, कुणाला दुःख मिळू नयेत ही प्रार्थना केली आहे, आणि ह्या आदर्शासाठी सांगितलेला मार्गही सोपा आहे, सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यम करवावहे, ह्या हजारो वर्षांपूर्वीच्या प्रार्थनेचा अर्थ सर्व एकत्र येऊन काम करू, आमच्यात द्वेष नसो, आमची प्रतिभा एकत्र वाढो.. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी अशाच हेवन ऑफ फ्रिडम ची कल्पना केली होती, ज्यात स्थानिक संकुचितपणाने स्वर्गाचे तुकडे होऊ नयेत, असा हेवन ऑफ फ्रिडम आपण बनवू ज्यात सहकार्य आणि समन्वय असो, भेदाभेदाला स्थान नको, आणि आपण जगाला अनावश्यक चिरांपासून मोकळे करू.”

आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात येण्याचे आवाहन करताना, तुम्हाला वेल्थ सोबत वेलनेस हवा असेल, हेल्थ सोबत होलनेस म्हणजे जीवनाची समग्रता हवी असेल, प्रॉस्परिटी सोबत पीस हवे असेल तर भारतात या, तुमचे स्वागत असेल असे ते अंतिमतः म्हणाले.

Previous Article

बेटी बचाओ आंदोलनात वणीला मिळाला पहिला बहुमान

Next Article

बाळासाहेब ठाकरे

You may also like