Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मराठी ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते

Author: Share:

शंकर गणेश दाते [१७ ऑगस्ट, १९०५ – १० डिसेंबर, १९६४] हे  मराठी सूचीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

इ.स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केलेली आहे. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे. यालाच दातेसूची असेही म्हटले जाते.

मात्र, मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचेही संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहीली. त्यांनी भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची १९०१-१९५१ भाग ३ ह्या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादनही केले.

दाते ह्यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे मूळ घराणे राजापूर तालुक्यातील अडिवरे येथील होते. त्यांचे वडील हे मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत हेडक्लार्क ह्या पदावर काम करत होते. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून दाते ह्यांनी मराठी आणि संकृत ह्या विषयात पदवीसाठी नाव नोंदवले होते. पण लोकसाहित्य ह्या विषयाची आवड निर्माण झाल्याने ते त्या विषयाकडे वळले आणि त्यांनी लोककथांचे संकलन प्रकाशित केले.

१९३४पासून त्यांनी मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेतले आणि एकट्यानेच काम करून १९६१ साली ते पूर्ण केले. त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठीची सामग्रीही जमवली होती. मात्र १० डिसेंबर, १९६४ रोजी वयाच्या साठाव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

मराठी ग्रंथसूची (भाग १ व २)

दाते ह्यांनी १९३४ साली मराठीतील प्रकाशित ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम हाती घेतले आणि २७ वर्षे परिश्रम घेऊन ते काम १९६१ साली पूर्ण केले. इ. स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांतील मराठी ग्रंथांची विषयवार आणि शास्त्रीय पद्धतीने सूची करून त्यांनी प्रकाशित केली.

प्रत्येक ग्रंथाविषयी ग्रंथकाराचे नाव, ग्रंथाचे नाव, आवृत्ती, प्रकाशनस्थळ,प्रकाशक, पृष्ठसंख्या, आकार, चित्रांची माहिती,मूल्य,अनुवादित ग्रंथ असल्यास मूळ ग्रंथ, ग्रंथकार, मुद्रक आणि मुद्रणस्थळ इतक्या पद्धतशीरपणे माहिती नोंदविली गेली आहे.  इ. टिपेत नोंदवलेली आहे. नोंदींच्या वर्गीकरणासाठी ग्रंथालयशास्त्रात वापरण्यात येणारी मेलविल डयुई ह्यांची दशांश-वर्गीकरण-पद्धती वापरली गेली.

संदर्भ: दाते, शंकर गणेश; मराठी ग्रंथसूची भाग १ [१८००-१९३७]; पुमु.; २०००; राज्य मराठी विकास संस्था; मुंबई आणि विकिपीडिया 

Previous Article

संगीताचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर : ( १८ ऑगस्ट १८७२—२१ ऑगस्ट १९३१ )

Next Article

इतिहास संशोधक निनाद बेडेकर

You may also like