महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या पाच शहरातील एकूण २२४ लक्ष फेसबुक वापरकर्त्यांमध्ये केवळ ४१% म्हणजे ९२ लक्ष मराठी भाषिक असल्याचा मजेशीर निष्कर्ष एका संशोधनातून उघड झाला आहे. पुणे येथे राहणारे व्यंकटेश कल्याणकर यांनी हे संशोधन केले आहे.
मुंबईतील १३० लक्ष फेसबुक वापरकर्त्यांपैकी केवळ ३०% म्हणजे ३९ लक्ष मराठी भाषिक आहेत. पुण्यातील ५८ लक्ष पैकी ३२ लक्ष म्हणजे ५५.१७% नाशिक मध्ये ९.३० लक्ष पैकी ६.७०% (७२.०४%), नागपूर मधील १६ लक्ष पैकी ८.६० लक्ष (४५.२६%) मराठी भाषिक आहेत. सर्वाधिक मराठी भाषिक नाशिक सोबत औरंगाबाद मध्ये आहेत. ८.१० लक्ष वापरकर्त्यांपैकी ५.९ लक्ष मराठी भाषिक आहेत.

व्यंकटेश कल्याणकर यांनी फेसबुकच्या पेड जाहिरातींच्या पोटेन्शिअल रिच (पोच) च्या माहितीतून मिळालेल्या निष्कर्षातून हे संशोधन केले आहे.
“संशोधन हा माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळेच मी सतत काहीतरी शोधत असतो. माझे पहिले-वहिले संशोधन अगदी साध्या-सोप्या भाषेत मी आपणासमोर सादर करत आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमधील मराठी भाषा अवगत असणा-या फेसबुक युजर्सच्या आकडेवारीचा मी अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी फेसबुकवर सशुल्क जाहिरात (Paid advertisement) करताना मिळणा-या Potential Reach या सुविधेचा वापर केला आहे.” – व्यंकटेश कल्याणकर
अर्थात यामध्ये काही तांत्रिक चुका राहिल्या असण्याची शक्यता त्यांनीही मंजूर केलेली आहे. तरीही, उपलब्ध सेकंडरी सोर्स पैकी बऱ्यापैकी विश्वासार्ह संशोधन मेथोडॉलॉजी वापरून संशोधन केले असल्याने या संशोधनाकडे एक स्तुत्य प्रयत्न म्हणून पाहण्यास हरकत नाही.
“ही माहिती मराठी भाषेचे प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, मराठी भाषा प्रेमी, माध्यमकर्मी तसेच इतरांनाही उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. संशोधनाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्रुटी दाखवून द्याव्यात ही विनंती.” – व्यंकटेश कल्याणकर
प्रमुख निष्कर्ष
• मुंबईमधील एकूण फेसबुक युजर्सच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी युजर्स मराठी भाषिक आहेत.
• इतर चार शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे
• पुण्यातील ४४ % पेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते हे अमराठी आहेत.
• मुंबईनंतर सर्वाधिक अमराठी फेसबुक युजर्स नागपूरमध्ये तर त्यानंतर पुण्यामध्ये आहेत.
• मुंबईमधील एकूण फेसबुक युजर्सच्या तुलनेत एक तृतीयांशपेक्षाही कमी युजर्स मराठी भाषिक आहेत.
• इतर चार शहरांच्या तुलनेत औरंगाबादमध्ये मराठी भाषिकांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे
• पुण्यातील ४४ % पेक्षा अधिक फेसबुक वापरकर्ते हे अमराठी आहेत.
• मुंबईनंतर सर्वाधिक अमराठी फेसबुक युजर्स नागपूरमध्ये तर त्यानंतर पुण्यामध्ये आहेत.
संशोधनकर्ते : व्यंकटेश कल्याणकर https://www.facebook.com/vyankatesh.kalyankaru