माणूस

Author: Share:

आपण सामाजिक कार्य करतो.सदैव ते करतांना आपलं घरादाराकडे लक्ष नसतं.संसार उघड्यावर पडतो अशावेळी.माणुसकी आपल्यात उरत नाही.मग आपलीच तारांबळ उडते.संसारातील आपली अर्धांगिनी आणि आपला परिवार आपल्याला विचारत नाही तेव्हा…खरं तर सामाजिक कार्य करता करता संसारातही लक्ष देणं आपल्या मुलाबाळाकडंही लक्ष देणं गरजेचं असतं.खरं तर सामाजिक भान जपतांना आपण हे विसरु नये की आम्हाला संसार नाही. आपण आपल्या परिवाराकडेही लक्ष द्यावं.त्यांचीही प्रशंसा करावी.ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.

कैलास असाच एक सामाजिक कार्यकर्ता होता.सतत तो लेखन करुन सामाजिक समस्यांना वाचा फोडायचा.यामुळं त्याचं नाव दूरवर झालं होतं.पण घरी मात्र त्याच्या लेखनीचा इज्जत नव्हती.तो पोटतिडकीनं लेख लिहायचा.त्याला फोनही यायचे दुरदुरुन.पण घरी मात्र त्याने लेखन करु नये असे म्हणत असल्याने त्याला परिवाराचा फार राग यायचा. त्याचे अश्रु अनावर व्हायचे.पण काय करणार तो…..त्याला वाटायचं की त्याचं काहीही चुकत नाही.दोष त्याचाच होता.पण तो आपल्या परिवाराला दोषी धरुन त्या भांडणात त्यांनाच जबाबदार धरायचा.

दिप्ती त्याची बहिण होती. फेसबुकवर मिळालेली मैत्रीण. तिला त्याने बहिण मानले होते. स्व-नात्यापेक्षा जास्त जपत होता तो तिला. तिला संसारातील भरपूर ज्ञान होतं.

एक दिवस त्यालाही वाटलं की तिला त्या गोष्टी सांगून पाहाव्या.विचाराचा अवकाश त्याने आपल्या बहिणीशी संवाद साधला.बहिण म्हणाली,

“दादा घाबरु नकोस.नातं टिकव.संसारातील पती पत्नी मुलं हे सारे घटक महत्वाचे.त्यांच्याशी तुझं वागणं बदल. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ दे. दादा,ज्याला त्याचे निर्णय घेऊ दिले की पुढे जाऊन दोष नाही देणार तुला.नात्यात मैत्री आली की सगळं सोपं होतं.पण आपण जास्त लडीवाळपणा लावु नये.तर आयुष्य वास्तविक जगायचं.त्यात कल्पकता नको.निदान नात्यात तरी नको.अशा गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचे आहेत.जर आयुष्यात कल्पकता आली तर अशा वेळी आपण भटकून जातो आणि घरच्यांनी सामावून घेतले नाही की आपलं सारखं चुकतच जातं.चांगली चरित्रवान मंडळी घाबरतात परत चुकायला.

चुका तर होणारच. पण क्षमाही करता आली पाहिजे.कधीकधी परिवाराचंही चुकते.पण त्या चुकांवर पांघरुण  घालता आलं पाहिजे.

दादा, तुम्हीच विचार करा.वहिनीची एकदा प्रशंसा करुन पहा.कधी वहिनीला छान दिसते आहेस हे म्हणुन पहा. तू आहेस म्हणून सर्व व्यवस्थित आहे.असंही म्हणून पहा.तू माझ्या मुलीची छान जबाबदारी सांभाळते अाहेस असेही म्हणुन पहा.केलेल्या अन्नाची मनभर प्रशंसा करुन पहा कधी.ह्या लहान सहान शुल्लक वाटणा-या गोष्टीही खरं तर आयुष्यं बदलतात.पण आपण कधीच त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.नशिबाला दोष देत बसतो.तू आहेस म्हणुन आज माझ्या एवढ्या पुस्तका छापल्या गेल्या आणि दुसरी कुणी असती तर स्वतःच्या सुख-सुविधा बघितल्या असत्या.असं तर कधी म्हणुन पहा.वहिनीच्या वाट्याचा वेळ लेखनीला देता ना तुम्ही! कधी लेखणी बाजुला सारुन बोलत जा तिच्याशी,संवाद साधुन तर पहा.संवाद फार महत्वाचा असतो नात्यातही…… म्हणून वेळेचं नियोजन करुन वहिनीला मुलीला वेळ द्या. कारण आपण त्यांच्या साठीच तर करतोय ना सगळं आणि घरचे पाठीशी असले ना की लेखणीला पण हुरुप येतो आणि माणसाला पण……हो ते पागल म्हणतात आपली लेखणी पाहुन.पण पागल असल्या शिवाय कसे जमेल म्हणा वहिनीला. म्हणा तु माझ्या सारख्या पागलाला सांभाळून घेते आहेस म्हणुन आज मी एवढा प्रसिद्ध आहे.बघा मग काय होतो याचा परिणाम तो…..”

आपण निघुन जाऊ एक दिवस. पण त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या आप्तस्वकियांवर होतो बाकी कुणावर नाही होत हा परिणाम. म्हणुन त्यांना प्रेम देऊन लेखन करा.नाहीतर सारंच संपेल.

मी नवखीच आहे दादा.पण मी बहीण ना. मला माझ्या भावाचा सुखी संसार बघायचा आहे बस.हो ते सगळं खरं असेल दादा तुमचं.भांडणं होतात घरात.पण भांडणात आपल्याला आपल्या चुका कळतात.रुसवे फुगवे झाले ते चालतं.पण संसारात दरार नको.पण त्याचा बाऊ करु नये.उगीच दुषणे देत बसु नये.नशिबाला आणि तिलाही…… दहा उलट बोलणारे मिळतील पण कुणाकडुन काय घ्यायचे हे आपल्याला ठरवायचं आहे आणि राग येणे म्हणजे नेमकं काय असतं ,राग येणे म्हनजे स्वत:च्या मनाची शांती नष्ट करणं असते.फालतु लोकांसाठी आपल्या मनाची शांती का नष्ट करायची?तु म्हणते तेच खरं म्हणायचं.ती पण खुश होईल आणि आयुष्य पार बदलुन जाईल.

आयुष्य फार छोटं असतं. मोठं बनवावं लागतं मोठं मन करुन. शेवटी सरणवर असतांना लोकांच्या आपल्या बद्दलच्या गोष्टीच राहुन जातात ,छान होता वाईट होता हेच राहातं आपल्या गेल्यानंतर….. आपले लोकं ओळखायचे शिका. जोडायचेही शिका.तोडणं सर्वात सोपं असतं.पण टिकवून ठेवणं फार कठीण असतं.तेव्हा नका करु खुप बडबड.भांडणदेखील. तिच्या नातेवाईकांशीही पाहुणे म्हणुन फक्त दोन शब्द बोलत चला.मग पहा परिवर्तन. परिवर्तन काळाची गरज.

मला फार वाईट अनुभव आलेत.लोकं आपल्या बरोबर एकलेल्या गोष्टीवरुन धारणा बनवून वागतात.म्हणुन मी अश्या लोकांना आयुष्यातुन तोडुन टाकलंय,ते माझं यश पचवू शकत नाही याची खात्री आहे मला.मग काय करणार. सर्वांचे विचार घेऊन दु:खी राहाण्यापेक्षा सोडून द्या नं त्यांना आणि चालत राहावं सतत आपली पायवाट न थांबवता आपली लेखणी बस.

त्याला ताईचं म्हणणं पटलं होतं आपण संसारात कमी पडलो.माहीत असूनही आपण संसारात त्या गोष्टी करीत नसल्याने घरचे लोकं असे बोलतात याची खंत त्याला वाटत होती.तो पूर्णतः बदलला होता.आता संसारात तो लक्ष देत होता त्याबरोबर लेखनही जपत होता.थोड्याच दिवसात तो प्रगतीपथावर गेला.हे सगळं त्या दिप्तीच्या मार्गदर्शनाचा प्रभाव होता.ती त्याच्या पेक्षा लहान होती.पण तिनं पुण्याईचं काम केलं होतं.जे त्याला माणूस बनायला कामी आलं होतं.

       अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०

Previous Article

कविता महाजन

Next Article

अंबर्जे गावासाठी दीड कोटींची पाणी योजना मंजूर

You may also like