Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना:

Author: Share:
मंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना:
मराठी रूपांतर हर्षद माने
हिंदू धर्मातील विचार भव्य आहेत हे हिंदू धर्माच्या कुठल्याही पुस्तकातून जाणवते. ते व्यापक आहेत, सार्वत्रिक आहेत आणि बहुतांशी कालातीत आहेतच पण त्यांचे दर्शन वैश्विक सुद्धा आहे.
मात्र मंत्रपुष्पांजलीमधून हिंदू धर्मातील राजकीय विचारही किती प्रगल्भ होते हे समजून येते. राष्ट्र ही संकल्पना पाश्चिमात्य असल्याचे ज्यांचे म्हणणे आहे, त्यांनी मंत्रपुष्पांजली जरूर वाचावी. राष्ट्र, ते कसे असावे व्हायचे सुंदर वर्णन त्यात आहे. साम्राज्य आणि सार्वभौम हे आजच्या राजकीय विचारदर्शनातील शब्द मंत्रपुष्पांजलीत वापरले गेले आहेत. इतकेच नव्हे, तर वैराज्यं हा आजच्या पाश्चिमात्य आणि पूवीचे आधुनिक राज्यशास्त्र अभ्यासकांच्या गावीही नसलेला शब्द त्यात आहे. या अर्थाने मंत्रपुष्पांजलीचा अर्थ व्यापक आहे आणि आजच्याही काळाच्या पुढे आहे.
एवढेच नव्हे, तर ही प्रार्थना केवळ तत्कलीन आर्यावर्त किंवा आजच्या भारतालाच नव्हे तर जगातील कुठल्याही देशाला लागू पडू शकते. ह्या अनुषंगाने ही विश्वप्रार्थना आहे.
इतका व्यापक राजकीय विचार आपल्या पूर्वजांनी केला होता, ह्याचा आपल्याला अभिमान हवाच! आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाने ती गायली पाहिजे. गणपती आरतीनंतर आणि इतर पूजास्थानी बऱ्याचदा ह्याचे पठण होते. मात्र सर्वसामान्यांना त्याचा अर्थ माहित नसल्याने ह्या प्रस्थनेची व्यापकता आणि राष्ट्रीयत्व लक्षात येत नाही.
ह्यासाठीच, ह्या प्रार्थनेचे मराठी रूपांतर मी केले आहे. आता अर्थ नीट समजून घेऊन ती सर्वत्र गायली जावी.
आज आपल्या प्रिय भारतभूमीसाठी आपण ही प्रार्थना म्हणू शकतो. ह्यासाठीच मी त्याचे मराठी रूपांतर केले आहे. एक आणि सांगा कसे वाटले.
 
ह्याचे पठण सर्वत्र व्हावे!
https://youtu.be/Jl9zNbZE2mY
Previous Article

मुंबईचा राष्ट्रीय तेजोमय समाजरत्न पुरस्काराने निलेश राणे यांचा गौरव

Next Article

श्रद्धा…

You may also like