पणजी मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ४८०३ मतांनी विजयी

Author: Share:

गोवा येथे पणजी मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ४८०३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा पराभव केला. मात्र, आधी देशाचे संरक्षण आणि आता गोव्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या पर्रिकरांना नऊ ते दहाहजाराच्या फरकाने विजय अपेक्षित होता असे मानले जाते. पर्रीकरांनी मात्र, विजयावर समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्यावर सहा महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून येणे मनोहर पर्रीकरांना बंधनकारक होते.

गोव्यातील वालपोई येथे दुसऱ्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचे विश्वजीत राणे यांनी काँग्रेसच्या रॉय यांचा दहा हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे, भाजपचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोन आमदारांनी वाढले आहे.

पणजीत ७०% तर वालपोईत ७९.८० टक्के मतदान झाले होते.

गोव्याव्यतिरिक्त काल दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या जागांसाठीसुद्धा पोटनिवडणूक झाली. सध्या बवाना येथे आप पुढे असल्याचे वृत्त आले आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे.

Previous Article

नटवर्य मामा पेंडसे अर्थात चिंतामणी गोविंद पेंडसे

Next Article

२८ ऑगस्ट

You may also like