मनोभावी श्रावण

Author: Share:

पावसाळा म्हटल की प्रेमाची सुरवात होते असं म्हणतात. उन्हाळ्यात घामाच्या धारेने तडफुन निघालेले लोक व कोमेजून पडलेल्या निसर्गाला नवीन बहरच येते जणू. अशा परिस्थिती नंतर पावसाळा सुरु होतो.पावसाळ्यात सगळीकडे आनंदी व रम्यमय झालेलं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं. या ऋतूत मन प्रसन्न आणि अाल्हादकारक झालेलं असते. याच ऋतूत श्रावण महिना सुद्धा येतो. श्रावण महिन्यात असं म्हणतात की जो हा महिना भक्तीभावाने याच पालन करतो त्याला त्याच पुण्यफळ व मुक्ती लाभते.

  श्रावण हा चातुर्मास मधील सर्वात महत्वाचा महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र म्हणून पाहिले जाते. श्रावणात सगळीकडे उत्साह बघायला मिळतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा मागेपुढे श्रावण नक्षत्र असते. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो.तेव्हा सौर श्रावण सुरु होतो.श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते.श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते. सगळीकडे भक्तीसागर हा उमडून आलेला असतो. श्रावण महिन्यात शाकाहारी जेवणाला प्राधान्य दिले जाते.मांस,मदिरा याचं सेवन करण्यास प्रतिबंध आहे या महिण्यात.

        श्रावण महिन्यात व्रतवैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात.श्रावणी सोमवार हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्रत आहे व या दिवशी शिवामूठ ही महादेवाच्या पिंडीवर अर्पित केली जाते. तसेच श्रावणी सोमवार,शनिवारला ही फार महत्त्व आहे.या दिवसांमध्ये व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होते असे सांगितले जाते.

       श्रावण महिना फार पवित्र असल्याने या महिन्यात अनेक सण देखील असतात.

श्रावणातील सण

        नाग पंचमी:-श्रावणी शुद्ध पंचमी म्हणजेच नाग पंचमी.या दिवशी नागांची पूजा केली जाते.

        श्रावण पौर्णिमा:-श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन नारळी पौर्णिमा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी समुद्र किनारी राहणारे लोक वरुणदेवते पित्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरु होते.ज्या मराठी घरात रोजच्या खाण्यात नसतो,त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनवलेले खाद्य पदार्थ बनवतात.याच दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधते त्यावरून या पौर्णीमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू,शिव,सूर्य आदी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.

        श्रावण अष्टमी:-श्रावण वद्य अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती.श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात.कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला.या दिवशी भावीक स्त्रीपुरुष उपवास करतात. व कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल,गोपाळकाला,दहीहंडी साजरी करतात.

        पिठोरी अमावस्या:-पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा या महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे.संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पाठोरी व्रत करतात.याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी लोक पोळा नावाचा सण साजरा करतात.हा सण बैलांसंबधी असून या, दिवशी बैलांना शुंगारून त्यांची मिरवणूक काढतात.

        मंगळागौर:-याच महिन्यात मंगळागौरी हा सण पार पडतो.यात नववधू हा सण करतात.

      “श्रावण मासी,हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे”

         या काव्य रचनेतून श्रावण मासाचे वर्णन केले आहे.ही कविता बालकवींची आहे. या दिवसात पृथ्वीच्या पोटातून नवीन झाडे-झुडपे,हिरवळ निर्माण होत असतात.

 –    वैभव गुलाबराव सुर्यवंशी साठे महाविद्यालय,विले पार्ले   (माध्यम विभाग) 9757305726

Previous Article

आतातरी आमची दया करा…

Next Article

१३ ऑगस्ट १८९८

You may also like