मनमोहन फेटावाला

Author: Share:

एकदा लोकांचा `मनमोहन फेटावाला’ नावाचा एक प्रमुख नेता खूप आग्रह झाला म्हणून नाईलाजाने भाषण द्यायला गेला. तो अत्यंत मुखदुर्बळ होता. नावात मन असले तरी तो सहसा मनातले बोलायचा नाही.

त्याने लोकांना विचारले मी ज्या विषयावर भाषण देणार आहे तो तुम्हाला माहीत आहे का? लोक म्हणाले, नाही माहीत !

मौनीबाबा म्हणाले माझा काय विषय आहे हेही तुम्हाला माहीत नाही तर तुमच्यासमोर बोलण्यात “अर्थ” नाही.

असे म्हणून तो निघून गेला.

लोक जरा लज्जित झाले व त्यांनी काही महीन्यांनी मौनीबाबास परत आग्रह करकरुन भाषणाला बोलावले.

नाईलाजाने मौनी बाबा गेला व त्याने लोकांना विचारले मी ज्या विषयावर भाषण देणार आहे तो विषय तुम्हाला माहीत आहे का? लोक तयारीतच होते ते म्हणाले, होsssss.

मौनीबाबा म्हणाले जर तुम्हाला आधीच माहीत आहे तर मग बोलण्याची काय गरज आहे?

असे म्हणून ते निघून गेले.

आता मात्र लोक रागावले, आपला नेता काहीच बोलत नाही हे त्यांना पसंत पडेना, त्यांनी तिसऱ्यांदा जरा धमकावणीच्या सूरातच मौनी नेत्याला भाषणाला बोलावले.

नाईलाजाने मौनीबाबा आले. परत तोच प्रश्न विचारला, मी ज्या विषयावर भाषण देणार आहे तो तुम्हाला माहीत आहे का? अर्धे लोक म्हणाले होsssss…… अर्धे लोक म्ह्णाले नाहीsssss…….

मौनी बाबा म्हणाले, ” छान ! ज्यांना विषय माहीत आहे,त्यांनी माहीत नसलेल्यांना विषय समजाऊन द्यावा. मी जातो.

त्यानंतर लोकांनीही त्याचा नाद सोडून दिला.व त्याला कायमची रजा दिली.

तात्पर्य:- मनमोहन फेटावाला कधीही `मन की बात’ सांगू शकत नाही.

लेखक: चंद्रशेखर साने


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

वासनेचे शरीरसंबंध; जागतिक चिंतनाचा विषय

Next Article

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या

You may also like