मनमाड शहरात अतिक्रमणे जमीनदोस्त

Author: Share:

नाशिक(प्रतिनिधी): मनमाड शहरातील पाकिजा कॉर्नर येथे पालिकेने ठराव करून दिलेल्या गाळ्यामध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत ते गाळे जमीनदोस्त करण्यात यावे या मागणीसाठी रवि निकम या आरटीआय कार्यकर्त्याने उपोषण केले होते तसेच पोलीस प्रशासननाने देखील पालिकेस पत्र देऊन कळविले होते या आधारावर आज मुख्याधिकारी डॉ दिलीप मेणकर यांच्या नेतृत्वाखाली भल्या पहाटे अतिक्रमण मोहीम घेऊन सदरील गाळे जमीनदोस्त करण्यात आले.

शहरातील पाकिजा कॉर्नर येथे एका राजकीय पक्षाला पालिकेच्या सभेत ठराव करून कार्यालयाकरिता जागा दिली होती परंतु काही नागरिकांनी त्याचा दुरूपयोग करत आजूबाजूला अतिक्रमण वाढुन अवैध धंदे सुरू केले होते याबाबत अनेक वेळा तक्रारी झाल्या परंतु कोणतीच कारवाई होत नाही तसेच ही जागा उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळेच्या मार्गावर असल्याने त्रास होत होता याबाबत आरटीआय कार्यकर्ते यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण केले त्यावेळी लेखी पत्राद्वारे कारवाई करू असे सांगितल्या नंतर उपोषण सोडण्यात आले होते दिनांक २५ रोजी दिलेली मुदत संपल्यावर पालिकेने आज अचानक सकाळी भल्या पहाटे पोलीस बंदोबस्तात सदरील अतिक्रमण काढून टाकले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता या मोहिमेसाठी मुख्य शहर अभियंता सुतावणे कनिष्ठ अभियंता श्यामकांत जाधव राजेंद्र पाटील अभियंता सुतावणे कनिष्ठ अभियंता सुनील पाटील श्यामकांत जाधव संदीप तोरणे

पठारे दखने नाना जाधव यांच्यासह सुमारे १५०

कर्मचारी सहभागी झाले होते.सकाळी अतिक्रमण सुरू झाल्यनंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच वादग्रस्त अतिक्रमण काढल्यानंतर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.तसेच पालिका इतरांवर कारवाई करते की नाही याबाबत देखील कुजबुज सुरू होती.

ठळक घडामोडी

सूर्योदय होताच अतिक्रमण काढण्यास सुरवात

सुमारे १५० कर्मचारी व पोलीसांचा मोठा बंदोबस्त

मोहिमेबाबत प्रचंड गुप्तता

दोन जेसीबी दोन ट्रक व ट्रॅकटरांचा मोहिमेसाठी

प्रतिक्रिया
मंगळवारपासून धडक मोहीम : मुख्याधिकारी

पालिकेने राजकीय पक्षास कार्यालयास ठराव करून दिले होते परंतु येथे अवैध व्यवसाय सुरू केल्याने अनेकजणांना त्रास होता तसेच रस्त्याच्या मध्ये असल्याने वाहतुकीस अडथळा होत होता म्हणून अतिक्रमण काढले तसेच शहरातील बाकी अतिक्रमण धारकास नोटीस देऊन मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्यात येईल.

Previous Article

व्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.

Next Article

लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम संपन्न

You may also like