मनाच्या खिडकीतून !

Author: Share:

आपण सर्व मूर्ख आहोत. आपल्याला काहीच येतस नसतं, तरी आपण हळकुंडाच्या सालीने लगेच पिवळे होतो. ज्या स्टिफन हॉकिंगला साधं बोलता, चालता येत नाही तो माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर जगाला वेगळी दिशा देणारे संशोधन करतो. आपल्या आयुष्याचा पुरेपुर आनंद उपभोगतो. आणि आम्ही एवढ्याशा कष्टाने/स्ट्रगलने खचून जातो.

रसत्यावर पेपर टाकणारा मुलगा त्याच पेपरमध्ये लेख लिहितो. पेपर टाकता टाकताच त्या पेपरचा संपादक होतो. असं अचानक एका दिवसात घडतं का ? निश्चितच नाही. कारण त्यासाठी साधना लागते. कष्ट करण्याची तयारी लागते.

जगाच्या पाठीवर इतकी ग्रेट माणसं आहेत. ज्यांच्या कडून एक जरी गुण घेतला ना तर आयुष्याला “अर्थ” मिळेल. काही तरी करण्यासाठी कसलं तरी वेड लागतं तुम्हाला त्या वेडेपणात जगावं लागतं. रस्ता नसल्याने आपली बायको मेली म्हणून सलग २२ वर्ष डोंगर तोडण्याचं काम करणाऱ्या दशरथ मांझीला लोकांनी वेड्यात काढलं. पण त्या मांझीने सिद्ध करुन दाखवलं की, तो खरचं वेडा होता. तो आपल्या ध्येयाप्रती वेडा नसता तर त्याने इतिहास घडवलाच नसता. तुम्ही कोणतीही गोष्ट कराल ती अगदी वेडे होऊन करा, तुम्हाला यशच मिळणार नाही तर तुम्ही इतिहास घडवाल.

अगदी प्रेम जरी केलंत तरी ते वेडं होवूनच करा. जगाने तुमचा आदर्श घेतला पाहीजे. त्यात जर वेडेपणा नसेल तर त्याला काही अर्थ नाही. “लैला” हे नाव घेतल्यावर “मजनु आठवलाच पाहिजे असं प्रेम करावं. मी जी गोष्ट करेन ती सर्वोत्तमच असेल.

पण आपण असं जगत नाही. आपण मुळात मरायला जसे घाबरतो तसे जगायला पण घाबरतो. जी माणसं रुढी, परंपरा व संस्कार अश्या कुबड्या पुढे करतात. लोक काय म्हणतील असा विचार करतात, अशी माणसं मुळात घाबरट असतात. अशी माणसं आपल्या आयुष्यात काहीच करु शकत नाही. काही तरी करायचं असेल तर आधी स्वत:च्या वरचा विश्वास ढळू देऊ नका. बघा बदल आपोआप घडतील.

विवेक विजय सुजाता

Previous Article

” इवल्या इवल्या गोष्टी ” स्तंभलेखनसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

Next Article

आमची चूक झाली, फेसबुकचा सर्वेसर्वा झुकरबर्गचा माफीनामा

You may also like