महाराष्ट्र

Author: Share:

एक राज्य
घरटे माझे
कुशीत त्याच्या
विश्व पाझरे

इतिहास त्याचा
दुमदुमतो रंध्रात
आणि भूगोलाचे सौंदर्य
डोळ्यांत पाझरे

कला आणि संस्कृती
जीवनाचे कोंदण
आणि त्याचे संस्कार
कर्मातून पाझरे.

आई ती अभंगांतून होते
बाप करडा फटक्याचा
सह्याच्या कुशीत दोहोंचे
अमृत अहा पाझरे

लावणीचा श्रुंगार
अन् मधुरा गवळणीची
गोडवा भावगीताचा
अर्थघन पाझरे…

जाणता राजा इथला
वा राष्ट्रधर्म पानीपताचा
क्रांतीचा जयजयकार
संविधानातून पाझरे

लुगडी तील प्रेमळ माय
सखीच्या पदराची साय
महाराष्ट्राचा रुबाब
पैठणीतून पाझरे

असंख्य रंग ढंग
विशाल अनेकांग
त्यातून मराठीचा धागा
कणाकणातून पाझरे

सिंधूच्या मस्तकी जसा
सह्याचा मुकुट अहा
तसा भारताच्या मस्तकी
महाराष्ट्र साजिरे…

माणूस इथला प्रेमळ
बोली स्वच्छ निर्मळ
मग कशास पोकळ
भांडण पाहिजे

महाराष्ट्र एक जाण
नाही जातीची चाळण
मग तू आणि मी भांडण
कशास पाहिजे

उद्योग धर हाती
कर्माचीच काठी
डोकी घोंगडे संपत्तीचे
धरलेचि पाहिजे

हे न केवळ राज्य
एक वारसा संपन्न जाण
तो टिकवून वाढवून
पुढल्या पिढी
दिलाच पाहिजे

-अभिमानी महाराष्ट्री
हर्षद माने

Previous Article

पश्चिमी क्षत्रपांची नाणी

Next Article

गौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान   

You may also like