महाराष्ट्र भूमी

Author: Share:

नमो महाराष्ट्र भूमी, प्राचिन भूधरा
विशाल सुप्रदेश व्यापी घन वना

तीर्थासम भासे प्रत्येक सरिता
सह्याद्रीच्या पर्वतरांगा वाढवीती तुझी शोभा

सागराची सीमा करी तुझी परिक्रमा
अगणिक संत जन्मले त्वा पोटी

सुंगंध फुला फुलांस मातीचा अंगारा
जगन्मान्य तुझी महती प्रत्येक क्षेत्रा

तुझ्या सुपुत्रांची कीर्ती तिन्ही लोकां
ऊज्वल भविष्याची देती कल्पना
व्हावे विश्वमान्य महाराष्ट्रभूमीने

हि मराठी मनाची भावना

@देवेंद्र देशपांडे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या

Next Article

श्रावणातला पाऊस

You may also like