Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

चवदार तळ्याचा महाड सत्याग्रह

Author: Share:
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात महाडच्या चवदार तळावरील सत्याग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तो २० मार्च रोजी १९२७ साली झाला होता. हा दिवस “सामाजिक सक्षमीकरण दिवस” म्हणून साजरा केला जातो.
पूर्वास्पृश्यांना मानवी अधिकार हिरावले गेले होते. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासारखा मूलभूत अधिकारही हिरावून घेतला होता. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई मंत्रिमंडळाने पूर्वास्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार देणारा ठराव केला. जानेवारी १९२४ मध्ये महाड पालिकेनेसुद्धा हा ठराव संमत केला. मात्र सवर्णांच्या दबावामुळे ह्या ठरावाची अंमलबाजवणी होत नव्हती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याविरुद्ध निशस्त्र सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. ह्या सत्याग्रहास अनेक सवर्णांचाही सक्रिय पाठींबा होता. यामध्ये एव्ही चित्रे,  जीएन सहस्त्रबुद्धे, टिपणीस ह्यांचा समावेश होता. महाड पालिकेचे अध्यक्ष टिपणीस यांनी सार्वजनिक ठिकाणे पूर्वास्पृश्यांना खुली करण्याची घोषणा केली आणि डॉक्टरांना महाडमध्ये बैठकीस येण्याचे निमंत्रण दिले. या बैठकीनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे निघाले . सर्वप्रथम डॉक्टर तळ्यातील पाणी प्याले आणि नंतर इतर सर्वांनी अनुकरण केले.
दुर्दैवाने, यावेळी एक अफवा पसरली की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह करतील, आणि त्यामुळे दंगल उसळली. डॉक्टरांनी त्यामुळे डिसेंबर २४ आणि २५ डिसेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत डॉक्टरांवर केस दाखल होऊन ती न्यायाधिष्टीत असल्याने डॉक्टरांनी आंदोलन परत घेतले. मात्र ह्या आंदोलनातच २५ डिसेंबर रोजी सहस्त्रबुद्धे यांनी  बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मनुस्मृतीचे दहन करण्याचा मांडलेला ठराव पूर्वास्पृश्यांनी मंजूर केला आणि मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. पुढे मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वास्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला.
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह भारतातील दलितोद्धाराच्या कार्यातील महत्वाचे पर्व मानले जाते. आजही डॉक्टरांचे अनुयायी या दिवशी चवदार तळ्यावर जाऊन डॉक्टरांच्या अतुलनीय कार्याची आठवण काढतात- कृतज्ञता व्यक्त करतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास मानाचा मुजरा!
संदर्भ: विकिपीडिया
Previous Article

क्रांतिसिंह नाना पाटील

Next Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता

You may also like