कर्नाटकात कमळ फुलणार…

Author: Share:

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. प्रसार माध्यमांनी केलेले सर्वेक्षण, राजकीय विश्लेषकांचे विश्लेषण, आकडेमोड चालू आहे. मोदींची जादू ह्या आकडेमोडीवर कशी भारी पडते बघने महत्वाचे आहे. मागील निवडणुकीच्या विधानसभेची आकडेवारी, तरुण वर्गावर मोदींची जादू ह्या साऱ्या गोष्टी पाहणे महतवाचे ठरेल.

काही तासांच्या अवधीतच कर्नाटकाचा निकाल हाती लागेल आणि सर्व विश्लेषकांची मते प्रसार माध्यमांनी केलेलं सर्वेक्षण यावर मोदींच्या जादूचा परिणाम नक्कीच जाणवेल. भाजपा आज तरुण वर्गावर जास्त लक्ष केंद्रित करून आहे. कारण लोकसभेत भाजपाला तरुण वर्गामुळेच २७२ चा जादुई आकडा पार करता आला. सुजाण सुशिक्षित असा हा वर्ग योग्य त्याच उमेदवाराला निवडून देऊ शकतो. १८ ते २५ हा वर्ग मागच्या निवडणुकीत ७ लाखांच्या वर मतदार होता. मोठ्या संख्येवर मतदानाला जाणारा आणि पहिल्यांदाच मतदान करणार याची उत्सुकता असेलेला हा मतदार नक्की मतदांसाठी घराबाहेर पडतो.

७ लाख मागील निवडणुकीचे मतदार आणि ह्यावेळेला १५ लाखाच्या जवळपास तरुण वर्गाने नोंदणी केली होती. जवळपास २२ ते २३ लाखांच्या ह्यातरून वर्गाच्या उत्साहाला बघून आणि मोदींची जादू ह्या वर्गावर जास्त प्रभावी असून आज कर्नाटक निवडणुकीत नक्कीच सरकार बदलात तरुण वर्ग महत्वाची भूमिका बजावेल. मोदींच्या झालेल्या २१ सभांमध्ये तरुण वर्गाचा प्रभाव दिसून आला. कर्नाटकात हाच सुजाण सुशिक्षत तरुण वर्ग कर्नाटकच्या सत्तेतील बदलास कारणीभूत ठरेल. भाजपने तरुण वर्गाचा आणि मोदींचा हुकमी एक्याप्रमाणे जादू चालवलीय.

१९९४ पासून कर्नाटकात जनता दलचे सरकार तर १९९९ मध्ये काँग्रेसचे सरकार पण त्यानंतर २००४ मध्ये कर्नाटकात युतीचे सरकार आले. जनता दल धर्मनिरपेक्षने काँग्रेस बरोबर युती केली पण २००६ मध्ये जनता दलाने काँग्रेसबरोबरील युती संपुष्टात आणून २००६ मध्ये भाजप बरोबर युती केली. २००८ मध्ये एक हाती ११० जागा मिळवत भाजप सत्तेवर आले.अशा पद्धतीने कर्नाटकात दर पंचवार्षिकला सत्ता बदल होत आहे. २०१३ चे सर्व सर्वेक्षण खरे ठरले होते. सर्व एक्सिट पोल काँग्रेसलाच बहुमत सांगितले होते. पण २०१८ ला झालेल्या निवडणुकीत बऱ्याच एक्सिट पोलहे काही अंशी काँग्रेस तर काही भाजप तर कुणी त्रिशंकू स्थिती सांगत आहेत.

२०१३ मध्ये काँग्रेस २२३ पैकी १२२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि जंनतांदल प्रत्येकी ४० जागा जिकल्या. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला भरपूर यश मिळाले. मतांची टक्केवारी कमी जरी झाली तरी भाजप १७ जागांवर होता तर काँग्रेस ९ जागांवर होते. जनतादलला २ जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकातील जनताहि दर पाच वर्षांनी सत्ता बदल करण्याला पाठिंबा देत आहे. त्यामुळे २०१८ च्या आता होऊ घातलेल्या निवडणुकीतही कर्नाटकचा मतदार पुन्हा सत्ता बदल कडे जाऊ शकतो यात काडीमात्र शंका नाही. कारण वरील आकडेच आपल्याला सर्व चित्र स्पष्ट करत आहेत. पुन्हा एकदा भाजपाचे येडियुरप्पा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही.

मोदींच्या झालेल्या ५ भागातील सभांना साठ साठ हजारांवर नागरिकांचा प्रतिसाद मिळालाय. मोदींच्या भाषणाला होणारी उत्स्फूर्त गर्दी, सर्वच जातीतील तरुणांनाच मोदींना मिळालेला प्रतिसाद, तरुणांमधील मोदींविषयीची क्रेज बघता काँग्रेसच आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यादोंही पक्षाचे स्वप्न पार धुळीस मिळालेले दिसत आहे. मोदींच्या जादूला आज मोठं मोठं राजकीय विश्लेषकही गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, प्रसार माध्यम, राजकीय विश्लेषकांनी १५ तारखेच्या निकालबाबत आकडेमोड सुरु आहे. सर्वसामान्य कानडी मात्र राजकारण ओळखून आहे.

लेखक: विरेंद्र सोनावणे
संपर्क: 8888244883


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

न्यायदानात राजकारण नको

Next Article

भारतीयत्वाच्या बाता, राहुलजी, तुम्ही मारू नका !

You may also like