लोकहितवादी यांची शतपत्रे

Author: Share:

लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० या दोन वर्षात आपले विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. १९ मार्च १८४८ साली लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय हे २५-३० ईतके होते. भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर‘ या साप्ताहिकातून शतपत्र प्रसिद्ध होत असतं. शंभर निबंधाची एक मालिका म्हणजे शतपत्रे ‘लोकहितवादी‘ या टोपणनावाने लिहीली. हे शतपत्र खूप प्रसिद्ध झाल्याने गोपाळ हरी देशमुख यांची ओळख लोकहितवादी अशी झाली.

शंभर लेख म्हणजे शतपत्र असे असले तरी, ही शतपत्रकांची मालिका एकूण १०८ पत्रकांची आहे. शंभर पत्रे पूर्ण झाल्यावर पुढे अविरतपणे पत्र लिहिण्याची ईच्छा लोकहितवादी यांची होती. परंतू काही कारणास्तव साप्ताहिक प्रभाकर बंद पडल्याने ही लेखमाला बंद झाली. परंतू असे होउन सुद्धा लोकहितवादींनी आपले लिखाण सुरु ठेवले. ते विविध टोपणनावाने लिखाण करत असत.

त्या वेळस बालविवाह होत असे. बालविवाहाचे दुष्परिणाम या विषयावरं त्यांनी प्रभाकर मध्ये लिहून लोकांच्या समोर आणले. यानंतर लोकहितवादींनी अनेक विषयांवर, समस्यांवर पत्रांद्वारे लिखाण केले.

संदर्भ – विकिपीडिया.

Previous Article

Sujit Nayak’s 99 – The best performance of the T20 Mumbai League so far

Next Article

शालोम: “अस्त उदय”

You may also like