येवला तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून तयार केला रस्ता

Author: Share:

+:- उत्तम गिते: गावाला जोडणाऱ्या रस्त्याची खूप वर्षपासून चाळण झालेली होती.वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या म्हणून आंबेगाव येथील आव्हाड वस्ती वरील राहणाऱ्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळाकरून संध्याकाळी त्यांनी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दि. १० रोजी लोकवर्गणीतून रस्ता पूर्ण केला.

या प्रसंगी गावातील आव्हाड वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते भिमा आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, मोहन आव्हाड, बाबाजी आव्हाड, सतिश सोनवणे, सुनिल आव्हाड, मच्छिंद्र आव्हाड, यांनी श्रमदान केले व सागर सोनवणे यांनी सहकार्य केले.

Previous Article

भरपावसातही श्रमजीवीचे सैनिक आंदोलनात

Next Article

येवला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची १ कोटी ७५ लाखांची १८ कामे मंजूर

You may also like