Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लपंडाव

Author: Share:

आज पुन्हा जीव मुठीत धरून उभा होतो देवाच्या दारात,
देव म्हणाला होता, केव्हातरी खेळ खेळणार तुझ्याशी मंदिरात.

तीच गर्दी, तेच खोटे चेहरे ,त्यात एकच होता खरा चेहरा
देवाकडे वळून पाहिलं तर देव माझ्याकडे पाहून हसत होता.

नजर तिची नेहमी प्रमाणे मला शोधत होती
मी मंदिरात असल्याची तिला चाहूल जणू लागली होती,
देवसारखी ती सुद्धा माझ्याशी जीवघेणा खेळ खेळत होती.

मुखवट्या मागून मुखवटे त्यांच्या आडोशाला मी लपत होतो,
तिची नजर चुकवून देवासोबत मी खेळ खेळत होतो.

नजरेला नजरा मिळाल्या, चोरून त्या पाहत होत्या,
आठवणींच्या रांगा लागल्या, अश्रूतून त्या व्यक्त होत होत्या.

देवाला विचारलं, आज कसा रे हरलास..?
देव म्हणाला, शेवटचा डाव होता, जिंकू देऊ तुला,
काही दिवसांचा पाहूणा आहेस तू इथे,
त्यादिवशी आठवण करेन मी तुला.

कविता: सुशांत सदानंद मेस्त्री

Previous Article

झाडे लावा – झाडे जगवा

Next Article

२३ ऑगस्ट

You may also like