कुसुमावती देशपांडे

Author: Share:

माहेरचे नाव कुसुम जयवंत असलेल्या कुसुमावती देशपांडे  या मराठीतील लेखिका. मराठी लघुकथेला नवीन रूप त्यांनी बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन मोलाचे आहे. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता.  

पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर नागपूर विद्यापीठातून १९२६ साली बी.ए.ची पदवी घेतली. तेथून १९२९ साली इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजातून इंग्रजी वाङ्मय विषयात बीए केले.

नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या. “पासंग” या १९५४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.

२६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

डॉ. अनंत देशमुख यांनी कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करणारा ‘कुसुमावती देशपांडे’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

प्रकाशित साहित्य

कुसुमानिल (कुसुमावती आणि पती अनिल यांच्यामधील पत्रांचा संग्रह)

दीपकळी (१९३४)

दीपदान (१९४०)

दीपमाळ

पासंग (१९५४)

मराठी कादंबरी (पहिले शतक) (१९५३)

मोळी (१९४५)

Previous Article

१७ नोव्हेंबर 

Next Article

महाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक!! व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन

You may also like