कुमारी मातांचा प्रश्न; जागतिक चिंतनाचा विषय

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


प्रेम…..प्रेमाला अलिकडे फार महत्व आलेले आहे. मुलगी किंवा मुलगी वयात आल्यावर त्यांना ख-या प्रेमाचं नाही पण शरीर अवयवाचं फार आकर्षण वाटत असतं. या शरीर अवयवाची भुक भागविण्यासाठी तरुण नुकतीच वयात येणारी मुले ही प्रेमाची भाषा करीत असतात.
प्रेम म्हणजे त्यांना भातुकलीचा खेळ वाटत नाही.मग प्रेमात सगळं काही जायज असते असे म्हणत ही तरुण मंडळी या तरुण पणाची शारिरीक भुक भागविण्यासाठी शारिरीक संबंध प्रस्थापीत करतात.

काही तरुण हे जातीची सकस बंधनं असल्यानं फक्त वेळकाढु धोरण अवलंबून शरीरअवयवाची भुक भागविण्यासाठी प्रेम हे फक्त काही क्षणापुरतं करीत असतात. विवाह जुळत पर्यंत. यात भीती असते गर्भधारणा होण्याची…… पण केवळ वेळकाढु धोरण,त्यातच जातीची बंधनं. आंतरजातीय विवाह केल्यास ठार होण्याची भीती किंवा घरातुन बाहेर हाकलुन देण्याची भीती…… ह्यामुळे केवळ वेळकाढु धोरण अवलंबणारी मंडळी अशी गर्भधारणा झाल्यास घाबरुन जातात. काही पळ काढतात. तर काही तो गर्भ पाडण्याचा सल्ला देतात.

अलिकडे गर्भ तपासणी करतांना वा गर्भपात करण्याला बंदी आणलेली आहे.त्यामुळे असे तरुण घाबरुन जावुन मुलींना तशाच अवस्थेत टाकुन देवुन पळ काढत असतात. काही मुली गर्भ पाडतात, पण त्यासाठी गर्भधारणा झाली आहे हे वेळीच लक्षात यायला हवी.पण दोन तीन महीने पाळी न आल्यास ही नैसर्गिक समस्या गृहीत धरुन मुली वैद्यांकडे जावुन इलाज करुन घेत नाही. त्यातच पाळी आली नाही असे वैद्यांना सांगीतल्यास ते नानाप्रकारचे प्रश्न विचारतील ही भीती मनात धरुन ह्या मुली वेळीच तपासणी करीत नाही. मग अशातच जास्त दिवस निघुन जातात. त्यातुन गर्भ पाडताच येत नाही. गर्भपाताला बंधनं येतात.

गर्भ पडत नाही हे लक्षात येताच ह्या मुली ज्यांच्यापासुन गर्भधारणा झाली अशा मुलांना जेव्हा सांगतात. तेव्हा ते चक्क नकार देतात. हवं तर सांगतात की ही गर्भधारणा माझ्यापासुन झालेली नसुन तू इकडे तिकडे तोंड मारले असेल, त्यापासुन झाली असेल.पण ती गर्भधारणा कोणापासुन झाली हे फक्त मुलींनाच माहीत असते. त्या मुली विनंती करतात. पाया पडतात. पण त्याचा काही फायदा नसतो.मग कुमारीकेला प्रश्न पडतो.आता काय करायचे? आपल्या हातुन चुक तर झाली.सगळ्याच मुली नावाचा असे उत्तर ऐकुन घाबरतात. पण त्या परिस्थीतीला सामोरे जातात. आता चुक झाली पश्चाताप करुन फायदा नाही. त्या गर्भपात केंद्र शोधतात वा असे केंद्र शोधतात. ज्या केंद्रातुन समस्या सुटतील पण अब्रुला धक्काही लागणार नाही. त्या त्याच केंद्रात जावुन आधार घेतात. तर काही मुलींना ही केंद्रे माहीत नसल्याने जवळच्या दूर असलेल्या नातेवाईकांकडे आधार घेवुन बाळाला जन्म देतात. बाळाचा जन्म होताच हे पाप समजुन ह्या मुली त्या बाळाची कच-यासारखी विल्हेवाट लावतात.अर्थात मातीचा खड्डा खणुन बाळ दफण करणे वा बाळाला कचराकुंडीत टाकुन देणे. अशी बाळ अक्षरशः मोकाट कुत्री वा डुकरं कुरतडतांना बरेचदा सापडली आहेत.ही जराजर्जर अवस्था. एक खुनच.

विचारांची हत्या की चुकांची हत्या…..भावनांची हत्या की विश्वासाची हत्या……काहीच कळत नाही. शरीरअवयवाचं आकर्षण त्यातच मुलांचे खरे प्रेम जाहीर करणे. त्यातुन हे घोर पाप. स्वतःच्या कोकमधुन जन्म दिलेला मुलगाही शाप वाटतो. जन्म दिलेल्या मुलांनाही धाग्याने माझं बाळ म्हणता येत नाही. मनात इच्छा असुनही बाळाला वाढवता येत नाही. मनात इच्छा नसुनही बाळाला ठार करावे लागते. बाळाला ह्यात्यातच काही मुली जोपासण्याचा प्रयत्न करतात.

एखाद्या संस्थेला किंवा ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना बाळ दान देणे हे पुण्याचे काम…..पण अलिकडे असे आंतरजातीय प्रेम करणे वा मायबापाच्या मतानुसार लग्न न करणे हा कायदा नसला तरी कायद्यानुसार यावर समाजाचे नियंत्रण आले. असा गर्भपात झाला हे समाजाला माहीत जरी झाले तरी समाज त्या मुलीला स्विकारत नाही. काही ठिकाणी अशा प्रेमीयुगलांनी लपुन छपुन विवाह केलाही. पण इतरांनी तसा विवाह करु नये म्हणुन त्यांना ठार करण्याची उपाययोजना करतात. गावात हा प्रकार जास्त चालतो.शिवाय असे तरुण तरुणी आणि गर्भातलं अपत्य ठार केल्यानंतरही केस बनत नाही नव्हे तर ते गाव बनु देत नाही. सा-या प्रकरणावर पांघरुन.सगळा प्रकार अंधारात झाल्यागत पुराव्यासह नष्ट केला जातो. तर काही ठिकाणी दोष दोघांचा जरी असला तरी मुलींनाच ठार केलं जातं.

घोर पाप….तीहेरी खुन…..तरीही समाजमन शुन्न….. सा-या भावनाच नाही तर माणुसक्याही मेलेल्या.प्रेमीयुगलाचं शरीरअवयवाचं आकर्षण.पण बळी नवजात पाखराचा. ज्याचे जन्मानंतर डोळेही उघडलेले नसतात.नव्हे तर ज्यांना जग म्हणजे काय हेही समजलेलं नसतं. आई होण्याचं भाग्य सहसा मिळतं. कोणाला मिळतं, कोणाला मिळत नाही. कोणी लाचार असल्यागत बाळ व्हावं म्हणुन देवाचा धावा करतो.नवश कबुल करतो. पण तरीही होत नाही.या मातांना विना नवसानं होतं. पण त्या जगवु शकत नाही.हा फक्त भारत देशाचाच प्रश्न नाही तर संबंध जगाचा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणुन कायदेही आहेत.

हे घोर पाप. त्यातच प्रेमीयुगलाची होणारी ससेहोलपाट…..यामुळेच की काय आंतरजातीय विवाह केल्यास प्रेमीयुगलांना काही रक्कम सरकार देते. त्यांचे विवाह लावुन देते. नव्हे तर त्यांचा संसार फुलावा म्हणुन त्यांना काही बक्षीसही देते.

गर्भपात करणं वा भ्रुण तपासणी कायद्यानं गुन्हा आहे. कारण लोकांची मानसिकता. लोकांनीच या गर्भपात केंद्रात जावुन मुलींचे भ्रुण तपासणी करुन मुलींच्या जननसंख्येवर मर्यादा आणल्याने असे सरकारने उचललेले पाऊल रास्त.पण निदान या प्रेमीयुगलांसाठी जागोजागी बिनधास्त पणे गर्भपात केंद्र सरकारनं उघडावीत. लग्नापुर्वी असे शरीरअवयवाचे संबंध प्रस्थापीत करु नये यासाठी सरकारने जनजागृती करावी.नव्हे तर या जनजागृतीतुन एखाद्या प्रेमीयुगलाने ऐकले नाही आणि आणि गर्भधारणा झालीच तर त्या मुलींनी न घाबरता कितीही धमक्या मिळाल्या तरी पोलिस स्टेशनला तक्रार करुन त्या तरुणांना योग्य तो धडा शिकवावा.

पोलिसांनीही थेट व ठोस कार्यवाही करावी. जेणेकरुन दुसरी मंडळी असे खोटारडे शरीर अवयवाच्या आकर्षणापुरते मतलबाचे प्रेम कोणी करणार नाही. तसेच या गर्भधारण झालेल्या मुलींसाठी सामोपचाराचे केंद्र सरकारने उघडावे. त्या केंद्रात कुमारी मातांनाच संरक्षण नाही, तर कुमारी मातांना जन्म देण्यापासुन त्यांचं संगोपन करण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध होतील. या केंद्रात कुमारीकेला प्रसुतीपर्यंतच्या सुविधा ह्या विनामुल्य असाव्यात. झालेलं बाळं दत्तक द्यायचं की नाही हे त्या मातांनाच ठरवता यावं. तसच न्या मागण्यासाठी स्पेशल कक्ष या कुमारीकांसाठी सरकारनं उपलब्ध करुन द्यावं. प्रेमात लपुनछपुन का होईना शरीरसंबंध करायला न घाबरणारा लग्नास का घाबरतो यासाठी समुपदेशन करणारी केंद्र जागोजागी असावी. या केंद्रातुन कुमारीकांना न्याय मिळायला हवा. असा लग्न करत नसेल तर जबरदस्तीनं त्यांचं लग्न लावण्याच्या गोष्टी अशा केंद्रात व्हाव्यात. अशी केंद्र स्थापन करण्याची जागा पोलिस स्टेशनच्या आवारातच असावी.

नागपुर मध्ये वानाडोंगरीला असेच आशा फाउंडेशन नावाचे समुपदेशन केंद्र आहे. त्यांच्या संचालिका श्रीरामे आहेत.त्या अशा कुमारी मातांना संरक्षण देतात. त्यांच्या कडे गेलेल्या मुलींना त्या घालवुन न देता प्रथम मुलांना समजावुन त्यांचं लग्न लावण्याचा प्रयत्न करतात.नव्हे तर अशा मुलांनी न ऐकल्यास अशा मुलांची पोलिसस्टेशनला तक्रार करुन त्यांना धडा तर शिकवतातच. शिवाय अशा मुलींना आपल्या होममध्ये ठेवुन त्यांना बाळंतपणापर्यंतच्या सर्व सुविधा पुरवुन त्यांना पायावर उभे राहण्यासाठी सशक्त करतात. बाळंतपणानंतर त्यांना होणारे बाळ त्यांना दत्तक द्यायचे की स्वतः सांभाळायचे याबद्दलही मातेला विचारुनच योग्य निर्णय घेतला जातो. जर बाळाला दत्तक देण्यास मातेने नामंजुरी दिली तर त्या मुलांच्या शिक्षणाची पासनपोषणाची जबाबदारी स्वतः घेतात. या संचालिका मग या मुलांचे शिक्षण एखाद्या वसतीगृहात ठेवुन करीत असतात.

कुमारी मातांचा प्रश्न हा भारतातच नाही तर जगात आहे. देशात तसेच जगात सर्वत्र बलत्कारही होतो.पण हा बलत्कार चव्हाट्यावर येवु नये व बदनामी होवु नये म्हणुन मायबाप चक्क मुलींना गप्प बसायला सांगतो. त्यातच खेडेगावात सोयी सुविधा नसल्याने व गर्भपात न झाल्याने अशा बलत्कारातुन दिवस जातात व संतती जन्मास येते. असे जन्मास घातलेले मुल हे मनात इच्छा नसुनही जेव्हा जन्मास येते. तेव्हा जरी समाज स्विकारत नसला तरी ती कुमारी माता बाळाला सांभाळत असते. तिनं पाप केलं नसलं तरी ते तिनं केलेलं पापच समजुन तिला वाळीत टाकतांना समाजाने तिच्या भावनांचा विचार का करु नये? खरंच यामध्ये स्रीलाच अबला समजावे? पुरुषांनी मात्र रंगरलिया मनवीत स्रीच्या शरीरअवयवाशी खेळावे. काम संपल्यावर मी नाही त्या गावचा म्हणत तिचा साथ सोडुन जावे. याला खरंच न्याय म्हणता येईल का?सगळेच भोग स्रीच्याच वाट्याला यावेत का?

हा एक गहन जागतिक प्रश्न असुन याची जागतिक स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे. आम्ही आमची पुरुषी जोखडाची मानसिकता गृहीत धरुन या स्रीयांवर कधी मताने तर कधी बळजबरीने या ना त्या मार्गाने बलत्कार करीत असतो. परिणाम विचारात घेत नाही. मग परिणाम दिसु लागताच तिला सोडुन पलायन करणे रास्त नसतांनाही आम्ही पलायन करतो. यात जर आम्हाला पलायन करायचेच आहे तर मग लग्नापुर्वी प्रेमच कशाला करावे. मुलींनीही लग्नापुर्वी मुलांशी गट्टी का करावी? असे आम्हाला वाटते. पण वयच ते….त्या वयात सगळेच फसतात.मग पश्चाताप येतो. ज्यावेळी वेळ गेलेली असते.

आतातरी मुलांनी नाही तर मुलींनी तरी सुधरावे.प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाही.शरीरअवयवाचं आकर्षण म्हणजे प्रेम नाही.प्रत्येक मुलगा काही प्रेम निभावेल असा नाही. म्हणुन आपणच प्रेम करण्यापुर्वी सावधान व्हावे किंवा प्रेम केलेही….आणि मित्राने शरीर सुखाची मागणी केलीच शरीर त्याला प्रदान करु नये. तर वेळीच दखल घेवुन त्या मुलाबद्दल दहा लोकांना नक्कीच सांगावे. आपले आईबाप, भाऊबहीण, नातेवाईक, तसेच इतरांना आपल्या प्रेमाबद्दल नक्कीच सांगावे. त्यांच्या आज्ञेत वागावे.ते तुम्हाला लहाणपणापासुन सांभाळतात. याही वेळी तुम्हाला चांगलाच मार्ग सांगतील. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.तसेच तुमचे जर प्रेम झाले असेल आणि तो शरीर सुखाची मागणी करीत असेल तर त्याला असे संबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी लग्न करण्यासाठी तयार करावे. तो तसे ऐकत नसेल तर त्याची सरळ पोलिस स्टेशनला तक्रार करावी वा त्याचा नाद सोडुन द्यावा. मात्र शरीर संबंध प्रस्थापीत करण्यापुर्वी प्रत्येक मुलींनी सावधान असलेलं बरं!

@अंकुश शिंगाडे, ९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

आपल्याकडे सांस्कृतिक अभिज्ञता नाही : डॉ. अरुणा ढेरे

Next Article

शाळा

You may also like