नॅक मानांकनात के टी एच एम महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी)  नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक मानांकनामध्ये के टी एच एम कॉलेज ३.७९ ( CGPA ) गुण प्राप्त करून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च गुणांक मिळवुन प्रथम आले.

के टी एच एम महाविद्यालयाला नॅक चा A ++ असा नेत्रदीपक दर्जा मिळाला आहे.

७ निकषांच्या आधारे नॅक या बेंगलोर स्थित मानांकन संस्थेने दि २२ व २३ सप्टेंबर २०१७ रोजी ‘ सेल्फ स्टडी रिपोर्ट ‘ च्या आधारे त्रिस्तरीय समितीद्वारे मूल्यांकन केले. आय क्यु ए सी (IQAC) कमिटीचे चेअरमन म्ह्णून प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड , समन्वयक डॉ एम बी मत्सागर ,उपप्राचार्य डॉ आर डी दरेकर , डॉ एस सी पाटील , डॉ पी व्ही कोटमे , क्रायटेरीया प्रमुख म्हणून डॉ बी एल गडाख , डॉ जे एन बांदल , डॉ एस एन पाटील , डॉ सी पी शिरोरे , डॉ एस एम मगदूम , डॉ एम एन शेलार , डॉ एस डी सावळे ,डॉ एन डी गायकवाड , डॉ पी एम नलावडे , डॉ एस ए गुरुळे यांनी तर सदस्य म्ह्णून डॉ वाय आर गांगुर्डे , डॉ व्ही बी कदम , डॉ एस के मुठाळ ,डॉ ए एल पाध्ये , व्ही ए टिळे , टी सी पाटील , डॉ एस आर गडाख ,डॉ डी एस खांडबहाले , डॉ जी जे मोगल ,  डॉ व्ही बी सोनवणे , एम जे राठोड , डॉ एन डी गायकवाड , जे आर परदेशी , आर सी पवार , एस बी निकम ,डॉ बी बी  पेखळे , डॉ बी जे भंडारे , डॉ यु ए अष्टुरकर , जी जी पाटील , व्ही आर काकुळते , एस आर पगार , डॉ आर आर काळे , एम डी पवार , ए एन अहिरराव यांनी तर उद्योग प्रतिनिधी म्हणून डॉ विजय विठ्ठल मठ्ठड,विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून डॉ गुणाले यांनी काम पाहिले.  नॅक कमिटी समोर महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहीती तसेच महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती यावेळी सादर करण्यात आली .

*या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार*,अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे,सभापती माणिकराव बोरस्ते,चिटणीस डॉ सुनिल ढिकले,उपसभापती राघो नाना अहिरे,सर्व संचालक मंडळ,सर्व शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ व्ही बी गायकवाड – प्राचार्य, के टी एच एम महाविद्यालय

संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक,आजी-माजी विद्यार्थी,शिक्षकेतर सेवक ,पालक यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालास महाराष्ट्रात प्रथम येण्याचा हा बहुमान मिळाला याचा आनंद होत असुन महाविद्यालयाचा लौकीक दिवसेंदिवस वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

@ प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

माझे इंजिनीरिंगचे प्रयोग; भाग २

Next Article

नांदगाव-मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

You may also like