नांदगाव- भालूर येथे स्वछ भारत अभियानासाठी किर्तनाद्वारे प्रबोधन

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) : कोजागिरी पौर्णिमेच औचित्य साधून ग्रामपंचायत भालूर आणि पंचायत समिती नांदगांव यांच्या वतीने समाजला स्वछतेविषयी आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी किर्तनाद्वारे प्रभोधन म्हणून हभप रेवणनाथ महाराज अकोला यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
संत गाडगेमहाराज, तुकाराम महाराज यांच्या अभंगाद्वारे मार्मिक आणि विनोदी शैलीत गावाचा विकास,स्वछता आणि हागणदारीमुक्त गाव यावर त्यांनी ग्रामस्तांना प्रबोधन केले किर्तनासाठी गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी, ग्रामविस्तार अधिकारी मांडवडे, सरपंच संदीप आहेर,पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे, शिवाजी महाराज तळेकर,नंदू महाराज आहेर,भावराव महाराज सोमासे, लहिरे महाराज,कैलास शिंदे,विनायक कुलकर्णी,रमेश निकम,संजय निकम,विलास आहेर,देविदास निकम,परशराम शिंदे, नामदेव निकम, राजेंद्र तळेकर यांच्यासह ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी कीर्तनानंतर स्वछ भारत अभियानाची माहिती सांगुन गावणेपन या उपक्रमात सहभागी होऊन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सरपंच संदीप आहेर यांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर श्रीराज प्रतिष्ठाण यांच्या वतीने सर्वाना कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने दुधाचे वाटप केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

नांदगाव-येथील मविप्र संस्थेच्या महाविद्यालयात डॉ.वसंतराव पवार यांचा स्मृतीदिन संपन्न

Next Article

७ ऑक्टोबर

You may also like