साहेब प्रतिष्ठानतर्फे किल्ले बांधणी स्पर्धा – २०१७

Author: Share:

मुंबई: साहेब प्रतिष्ठान, गोराई या संस्थेच्या वतीने यंदाही सलग चौथ्या वर्षी “दिवाळीतील किल्ले बांधणी स्पर्धा – २०१७” चे आयोजन करण्याचे योजिले आहे. या स्पर्धचे परीक्षण २० ऑकटोबर रोजी संध्याकाळी ६ नंतर गोराई बाहेरील व किल्ल्यांचे अत्युत्तम ज्ञान असलेल्या मंडळींकडून होणार असल्याचे साहेब प्रतिष्ठानचे अभय अंगचेकर यांनी सांगितले आहे.

चारकोप – गोराई परिसरातील ज्यांना अजूनही या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, अशा सहकारी गृह संस्था / स्थानिक मंडळे / परिवार यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रु ३०००/- व आकर्षक चषक, रु २०००/- व आकर्षक चषक व रु १०००/- व आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. तसेच उर्वरित सर्व सहभाग कर्त्यांना उत्तेजनार्थ रु ५००/- व स्मृतिचिन्ह बहाल करण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क: विजय गाभूड ९८७०८५६६७५, प्रसाद घोलप ७७१८०३०२६६, सुरेंद्र भोसले ९७६८७८२७८२, लक्ष्मीदास सावंत ९९६९५००४६७, राकेश सकपाळ ९८१९५३२६८८.

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

या एक मुखाने महाराष्ट्राचे गीत गाऊया!!!

Next Article

३ ऑकटोबर 

You may also like