मुंबईच्या फलंदाजांचे खडुसपणाचे दर्शन…

Author: Share:

चिवट फलंदाजी करून वाचवला सामना…

५०० व्या रणजी सामन्यात मुंबईकर फलंदाजांनी आपल्या सुप्रसिद्ध “खडुस” स्वभावाचे दर्शन घडवून पूर्ण दिवस खेळून काढून सामना वाचवला.

आजच्या शेवटच्या दिवशी मुंबईसमोर पूर्ण दिवस खेळून काढण्याचे आव्हान होते. काल चार फलंदाज बाद झाल्याने फक्त शेवटच्या सहा फलंदाजांवर ही जबाबदारी होती. अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी आज पुन्हा डाव सुरू केला. काल खिंड लढवून ठेवलेला अजिंक्य रहाणे आज ४५ धावांवर बाद झाला. त्याने १३४ चेंडू खेळून काढले.

आजच्या दिवसाचा शिल्पकार ठरला सिद्धेश लाड. त्याने २७८ चेंडू खाऊन नाबाद ७१ धावा काढत एक बाजू लढवून ठेवली. काल नाबाद असलेल्या सूर्यकुमार यादवच्या १३२ चेंडूतील ४४ धावांच्या मॅरॅथॉन खेळीने दिवस भरून काढण्यात साथ दिली. खरी जिगर दाखवली अभिषेक नायरने जो ८ धावात बाद झाला मात्र त्यासाठी त्याने तब्बल १०८ चेंडू घेतले. धवल कुलकर्णी ३१ चेंडूत २ धावा काढून लाड सोबत नाबाद राहिला आणि ७ बाद २६१ धावांवर मुंबईने दिवस संपवला.

काल प्रूथ्वि शॉ ने ७१ चेंडूत ५६ धावा काढून चांगली सुरुवात दिली. मात्र आदित्य तरे श्रेयस अय्यर आणि नाईट वॉचमन विजय गोहील लवकर बाद झाल्याने मुंबईची अवस्था बिकट झाली.

आपल्या मॅरेथॉन खेळीत मुंबईकरांनी २३ चौकार लगावले. त्यापैकी रहाणे ने ४ तर लाड आणि प्रूथ्वि शॉने प्रत्येकी ७ चौकार लगावले.

५०० व्या सामन्यात मुंबईच्या विजयाचे स्वप्न मात्र बडोद्याच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी भंग केले. मात्र मुंबईच्या चिवट खडुस फलंदाजीचे पुन्हा दर्शन घडल्याने मुंबईचे प्रेक्षक खुष झाले.

Previous Article

आम्ही सारे बेडूक

Next Article

वाचा दिवाळी अंक; “साहित्य उपेक्षितांचे”

You may also like