Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

आसाममध्ये पुराचे थैमान : ‘काझीरंगा’ अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू

Author: Share:

आसाममध्ये पुराने थैमान घातल्याने ‘काझीरंगा’ अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ‘काझीरंगा’मधील ३० टक्के परिसर पुराच्या पाण्याखाली आहे, अशी माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. मृत प्राण्यांमध्ये १७८ हरिण, १५ गेंडे, चार हत्ती आणि एका वाघाचा समावेश आहे.

राज्यातील २५ जिल्ह्यांतील ३३ लाख नागरिकांनाही या पुराचा तडाखा बसला आहे तसेच घरे, सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने ईशान्येकडील राज्यांचा देशातील इतर भागाशी संपर्क तुटला आहे.

गेल्या वर्षी पुरामुळे ५०३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता. या अगोदर महिन्याच्या सरुवातीलाही पुरामुळे १०५ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अभयारण्याने दिली.

२०१२ मध्ये पुरामुळे ७९३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता.

Previous Article

उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले, २३ ठार ४० प्रवासी जखमी

Next Article

१९ ऑगस्ट: मानवाच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावल्या तीन शास्त्रज्ञांचा दिन

You may also like