कविता महाजन

Author: Share:

“बायकांचे पाय भुतासारखे उलटे असतात.. कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळलेले असतात…”

                                                                                                               – ‘ब्र’ कादंबरीतून 

जन्म : ५ सप्टेंबर १९६७

निधन: २७ सप्टेंबर २०१

“आता मला काय नक्की हवंय ते स्वत:शी मोकळेपणी ठरवता यायला लागलं. माध्यमांशी तडजोड थांबवली. जे मनात आहे ते कधी रंगांतून, कधी शब्दांतून असं व्यक्त होतं राहिलं. लिहिलेलं आपल्या जाणिवांशी जुळतंय की नाही ते पुन: पुन्हा तपासून पाहात राहिले. तब्बल १९ वेळा मी ‘कुहू’चा ड्राफ्ट लिहून काढला. कुहूचा माणसांच्या जगाकडे आणि पुन्हा परत असा सगळा प्रवासच मुळात गाण्यांच्या सोबतीने होतो. त्याच्या मनात उमटणाऱ्या भावनांना जे स्वर होते त्यांची गाणी झाली. काही स्वर, शब्द त्याचे स्वत:चे आकार, रंग घेऊनच जन्मतात. त्यांना कॅलिग्राफीशिवाय पर्याय नव्हता. उदा. पक्ष्याचे पिल्लू जेव्हा कळवळून आई. म्हणून ओरडते तेव्हा त्याच्या त्या आवाजाला पडद्यावर कॅलिग्राफीमधून साकारावेसे वाटले. मग हळूहळू एकेक माध्यम ‘कुहू’मध्ये आपापली जागा घेऊ लागलं. ऑडिओ, व्हिडीओ, कॅलिग्राफी, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, अ‍ॅनिमेशन इत्यादी. एकूण साडेतीन तासांची ही डीव्हीडी बनली. माध्यमांचं हे एकात एक गुंतणं आहे. अनेक माध्यमं एकत्रित येऊन त्यांचं वेगळं असं माध्यमच विकसित झालं आहे या प्रयोगात. प्रत्येक माध्यमाची आपापली एक वेगळी मजा आहे….”

कविता महाजन यांनी कुहू च्या निमित्ताने लोकप्रभाला दिलेल्या मुलाखतीतून साभार

कविता महाजन मराठी लेखिका, कवयित्री होत्या. त्यांचा जन्म नांदेडचा आणि शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयात एम.ए. केले होते.

त्यांनी कादंबरी, काव्यसंग्रह, बालसाहित्य, कथा-लघुकथा, अबुवाडीत, संपादन, व्यक्तिचित्राने अशा लेखनाच्या विविध क्षेत्रात मुक्त संचार केला होता. स्त्री-पुरुष, महिलांचं राजकारण, सामाजिक संस्थेतील भ्रष्टाचार, आदिवासी कला कविता अशा कितीतरी गोष्टी त्यांनी अनुभवीं लिहिल्या त्यामुळे  घरामध्ये एसीमध्ये बसून केलेलं माझं लिखाण नाही. असे त्या अभिमानाने सांगतात. कुहू मधून त्या निसर्गदत्त चित्रकार वाटतात. कुहू भारतातील पहिली मल्टिमीडिया कादंबरी आहे.

“तुम्ही जर घाण दाखवलीच नाही तर ती साफ कशी करणार? सोलापूर मधील एक वेश्या माझं पुस्तक घेऊ इच्छिते कारण त्यात तिचं जीवन आहे हेच खरे यश आहे…”  – कविता महाजन

प्रकाशित साहित्य

अंबई : तुटलेले पंख, अनुवादित कथासंग्रहाचे संपादन

आग अजून बाकी आहे अनुवादित कथासंग्रहाचे संपादन

आगीशी खेळताना.. अनुवादित व्यक्तिचित्रणे

आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा संपादित

कुमारी माता अनुवादित पुस्तक, संपादित

कुहू  लेखसंग्रह

कुहू (लहान मुलांसाठी) लेखसंग्रह

ग्राफिटीवॉल लेखसंग्रह

बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह बालसाहित्य

जोयानाचे रंग बालसाहित्य

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, कादंबरी, राजहंस प्रकाशन

तत्पुरुष काव्यसंग्रह

तुटलेले पंख (संपादित: भारतीय लेखिका पुस्तक मालिका) लेखसंग्रह

धुळीचा आवाज काव्यसंग्रह

पूल नसलेली नदी (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह

म्रृगजळीचा मासा काव्यसंग्रह

ब्र कादंबरी, राजहंस प्रकाशन

भिन्न कादंबरी, राजहंस प्रकाशन

रजई (इस्मत चुगताई) लघुकथासंग्रह

वारली लोकगीते आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन, साहित्य अकादमी

वैदेही यांच्या निवडक कथा (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह

समतोल खा सडपातळ रहा पाकशास्त्र, इंद्रायणी साहित्य प्रकाशन

समुद्रच आहे एक विशाल जाळं कवितासंग्रह, राजहंस प्रकाशन

पुरस्कार

          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)

          कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)

          साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)

  मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३)

Previous Article

पंडित तुलसीदास बोरकर

Next Article

माणूस

You may also like