Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पाच दिवसांपासून ठप्प असलेली आसनगाव रेल्वे वाहतूक अखेर सुरु

Author: Share:

आसनगाव येथे झालेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे  ठप्प झालेली कसारा- टिटवाळा रेल्वे मार्गावरची वाहतूक पाच दिवसानंतर अखेर सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मध्य रेल्वेने आज शनिवारी दुपारपर्यंत वाहतूक सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सकाळीच ७.५५ मिनिटांनी आसनगावहून पहिली लोकल कसाऱ्याच्या दिशेने रवाना झाली. दुपारी २ वाजेपर्यंत कसारा मार्ग पूर्णपणे पूर्ववत होईल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर दुरांतो एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, मात्र तांत्रिक कारणामुळे वाहतूक ठप्पच होती. लोकल समवेत याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला. नाशिकवरुन सुटणाऱ्या ३० पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या.

शुक्रवारी प्रवाशांनी, वाशिंद स्थानकात रेल रोको आंदोलन केले होते. काही प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरचे कार्यालय गाठून लोकल सेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. यासाठी आणखी काही दिवस लागतील असे उत्तर मिळाल्याने प्रवाशी संतापले. संतप्त प्रवाशांनी रुळावरुन उतरून दादर- अमृतसर एक्स्प्रेस रोखून धरली. तातडीने लोकल सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.

Previous Article

नांदगाव येथील सम्राट बहुउद्देशिय गणेश मंडळाने केले मोफत नेत्र तपासणी शिबीरीचे आयोजन

Next Article

आपल्या मुलांना या सवयी लावल्याच पाहिजेत

You may also like