त्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप?

Author: Share:

भाजपला मिळत असलेल्या तुफान यशाचे विश्लेषण करत असताना त्रिपुरा आणि आता कर्नाटक विजयकडे भाजपचे लक्ष आहे. त्रिपुरा राज्यात भाजपला १.५ % मते मिळतात गेल्या निवडणुकीत आज तिथे भाजप सरकार येते याला भाजपचे खूप मोठे यश म्हणावे लागेल. भाजपच्या ह्या विजयात संघ प्रचारकांचा खूप मोठा वाटा आहे. ह्या साऱ्या विजयी घोडदौड नंतर आज कर्नाटकातील निवडणूक विविधकारणांसाठी महत्वाची ठरणार आहे. दक्षिणेतील मोठ्या राज्यांपैकीं कर्नाटक हे राज्य.

काँग्रेस जवळील चार राज्यांपैकी कर्नाटक एक राज्य. निवडणूक जिंकण्यासाठी करो यामारोची स्थिती काँग्रेसची झाली आहे. भाजपचे सर्व मंत्री मंडळ कर्नाटकात तळ ठोकून आहेत. राहुल गान्धी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचेहि बरेच दिग्गज नेते कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीचे विश्लेषण करताना कर्नाटकातील १९९४ असून तर आतापर्यंतचे आकड्यांचा अभ्यास करणे तेवढेच गरजेचे आहे.

१९९४ च्या निवडणुकीत जनता दलला २२१ पैकी ११५ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २२३ पैकी ४० जागा मिळाल्या. अन कॉंग्रेस २२१ पैकी ३४ जागा मिळाल्या होत्या. टक्केवारीचा विचार करता ३५.५४ % मते जनता दल तर २६.९५ % मिळवत काँग्रेस दोन नंबरवर होती. भाजप १६.९९% मिळवत तिसऱ्या क्रमांकावर होती. भाजपाला ह्या निवडणुकीत ४ जागांचा फायदा झाला. २००४ च्या निवडणुकीत भाजपाला ७९ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला.. कर्नाटकात २००४ च्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. जनता दलाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने सत्ता मिळवली.

धरम सिंग यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांनंतर जनता दलाने काँग्रेसचा पाठिंबा काढत भाजला समर्थन दिले आणि कुमारस्वामी हे जनता दलाचे नेते मुख्यमंत्री म्हुणुन शपथ घेतली आणि बी स येड्डियुरोप्पा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.२००६ मध्ये जनता दलाबरोबर भाजप जाऊ शकते तर २०१८ च्या निवडणुकीतही त्रिशंकूस्थिती निर्माण झाली तर भाजप जनता दलाबरोबर जाऊ शकते. पण सद्यातरी भाजपचं पारडं जड आहे कारण सर्व निवडणूकपूर्व सर्व्हेत भाजपलाच बहुमत दिसत आहे. सि वोटर, ग्राफ्निले, सि-फॉर यांसारख्या पुल्लिंग फर्मने भाजपलाच पूर्ण बहुमत सांगितले आहे. सरासरी १२५ जागा भाजपाला सांगितल्या आहेत.

१९९४ पासून कर्नाटकात जनता दलचे सरकार तर १९९९ मध्ये काँग्रेसचे सरकार पण त्यानंतर २००४ मध्ये कर्नाटकात युतीचे सरकार आले. जनता दल धर्मनिरपेक्षने काँग्रेस बरोबर युती केली पण २००६ मध्ये जनता दलाने काँग्रेस बरोबरील युती संपुष्टात आणून २००६ मध्ये भाजप बरोबर युती केली. २००८ मध्ये एक हाती ११० जागा मिळवत भाजप सत्तेवर आले. अशा पद्धतीने कर्नाटकात दर पंचवार्षिकला सत्ता बदल होत आहे. कर्नाटकातील जनताहि दर पाच वर्षांनी सत्ता बदल करण्याला पाठिंबा देत आहे. त्यामुळे २०१८ च्या आता होऊ घातलेल्या निवडणुकीतही कर्नाटकचा मतदार पुन्हा सत्ता बदल कडे जाऊ शकतो यात काडीमात्र शंका नाही. कारण वरील आकडेच आपल्याला सर्व चित्र स्पष्ट करत आहेत. पुन्हा एकदा भाजपाचे येड्डियुरोप्पा मुख्यमंत्री होणार यात शंका नाही.

मोदींच्या झालेल्या ५ भागातील सभांना साठ साठ हजारांवर नागरिकांचा प्रतिसाद मिळालाय. मोदींच्या भाषणाला होणारी उत्स्फूर्त गर्दी, सर्वच जातीतील तरुणांनाच मोदींना मिळालेला प्रतिसाद, तरुणांमधील मोदींविषयीची क्रेज बघता काँग्रेसच आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यादोंही पक्षाचे स्वप्न पार धुळीस मिळालेले दिसत आहे. मोदींच्या जादूला आज मोठं मोठं राजकीय विश्लेषकही गोंधळून गेले आहेत.

राजकीय पक्ष, प्रसार माध्यम, राजकीय विश्लेषकांनी १५ तारखेच्या निकालबाबत आकडेमोड सुरु आहे. सर्वसामान्य कन्नडिया मात्र, राजकीय वर मोठ्या चाणक्षपणें ओळखून आहे.

लेखक: विरेंद्र सोनावणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

भारतीयत्वाच्या बाता, राहुलजी, तुम्ही मारू नका !

Next Article

भारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या

You may also like