ज्योतिष आणि आध्यात्मिक शास्त्र : डॉ. मो. शकील जाफरी

Author: Share:

otishमाझी मातृभाषा उर्दू असूनही मी तेलगू आणि उर्दू भाषेत ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्म या विषयावर बोलण्याचा अवसर प्राप्त झाले हे माझे भाग्यच म्हणावा लागेल. वरून पाहतांना हिंदू – मुस्लिम दोन्ही धर्म विरुद्ध दिशेचे वाटतात पण खोल अभ्यास केले तर एकच सार निघेल. माझ्या या बोलण्याने हिंदू – मुस्लिम समाजातील दरी कमी होत असेल तर उत्तमच.

            पूर्ण जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती मानला जाणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत ज्योतिष शास्त्र आणि अध्यात्मिक शास्त्र अग्र स्थानात आहेत. हे दोन्ही शास्त्र भारत देशाचा गौरव आहे . त्याचा पावित्र्य राखले पाहिजे.

             ज्या प्रमाणे एक नदीचा अंतिम लक्ष्य समुद्र आहे त्याच प्रमाणे प्रत्येक माणसाचा अंतिम लक्ष्य परमात्मा असला पाहिजे. परमेश्वरापासून दूर करणारा प्रत्येक शास्त्र एक विनाशाच आहे.

             या दोन्ही शास्त्राला विरोध करणार्याची संख्या कमी नाही. या शास्त्राचा विरोधकांना आपल्यातलेच काही अल्प ज्ञानी लोकांनी तयार केले कारण आपण या शास्त्राच्या आधारे सर्व स्वतंत्र देवून ईश्वराने जन्माला घातलेल्या माणसाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला.

             माणसाला नशीबीच्या,  भाग्याचा बेडीत जखडण्याचा प्रयत्न केला.

             ज्या धर्मात स्वर्ग आणि नारकाची कल्पना आहे त्या धर्मात माणूस  स्वतंत्र असतो या सामान्य ज्ञानाचा भान आपल्यातल्या काही लोकांना राहिले नव्हते.

             विचार करा जर नशिबात मी वाईट कार्य करीन असा लिहला असेल तर मी नक्कीच वाईट कार्य करणार चांगले कार्य करीन असा लिहले तर चांगले कार्य करीन तर म्हणजेच मी गुलाम आहे नशीबाचा ….

             जर यात पूर्ण तथ्य असेल तर चांगले करीन किंवा वाईट त्यात माझी स्वतःची इच्छाच नाही तर मग मला स्वर्गाचा पुरस्कार आणि नारकाची शिक्षा कुठल्या आधारावर देणार?

             आज समाजात सर्वात जास्त ज्योतिष शास्त्र आणि तसेच अध्यात्म शास्त्र बदनाम आहे. स्वार्थी आणि पाखंडी लोकांनी याला कारण आहे हे काय वेगळा सांगायची गरज नाही. आपण या बदनामीला रोखण्यासाठी योजना आखून क्रियाशील व्हायला हवा.

              इश्वराने मानव कल्याणाकरिता शिककवलेल्या ज्ञानाच्या आधारे कोणी कोणाला गुलाम बनवीत असेल आणि कल्याणकारी ज्ञान जर मारक ठरलं तर उपयोग काय?

             इस्लाम धर्माला पुनर्जीवित केलेल्या पैगंबर साहेब (स. अ. व. स.) यांचे पहिले उत्तराधिकारी हजरत अली अलैहिस्सालाम यांनी त्यांच्या शिकवणीत नेहमी अध्यात्म आणि धर्माला अग्र स्थन दिले आणि कर्म तसेच प्रार्थनेला महत्व दिले. या दोन्ही गोष्टीतून भाग्य बदलता येत असल्याचे सांगितले.

             मोहम्मद पैगंबर साहेब स्वल्लालाहू अलैही व आलेही व आलेही व सल्लम म्हणतात कित्येक लोक असे आहेत जे वयापेक्षा जास्त जगतात आणि कित्येक लोक असेही आहेत जे आपल्या वयापेक्षा लौकर मरण पावतात कारण माणसाने केलेल्या पाप त्याच्या आयुष्य कमी करून जीवन संपुष्टात आणते आणि माणसाने केलेल्या पुण्य कार्याने माणसाच्या आयुष्य वाढते. या बाबतीत श्री मदभगवदगीतेतल्या कर्म सिद्धांत विसरता कामा नये.

             हजरत अली इब्न अबूतालिब अलैहिस्सालाम म्हणतात की माणसाला अल्लाह ने स्वतंत्र म्हणून जन्माला घातला आहे, हे मानावा तू कोणाचाही गुलाम होऊ नकोस.

             ज्योतिष शास्त्रानुसार अस्ट्रोलॉजी आणि आस्ट्रॉनोमी दोन आहेत. इस्लाम धर्माने आस्ट्रॉनोमी शिकावे पण अस्ट्रोलॉजी शिकन्या पासून स्वतःला रोखावे असे सांगते. याचा एकमेव कारण म्हणजे माणूस ईश्वरा पासून दूर होऊ नये एवढाच आहे. या विषयावर हजरत अली  अलैहिस्सालाम यांचे प्रवचन असलेला ग्रंथ नहुजुल बालागहमध्ये अस्ट्रोलॉजी या विषयावर प्रवचन 1, 49, 85, 88, 89, 109, 112 आणि 124 मध्ये तसेच आस्ट्रॉनोमी या विषयावर प्रवचन 77, 88, 89, 107 आणि124 मध्ये सविस्तर चर्चा आहे.

             हजरत अली इब्न अबू तालिब अलैहिस्सालाम यांच्या म्हणणे आहे की “तुम्हाला असा वाटेल की चांगल्या आणि वाईट मुहूर्ताची माहीत असल्याने लोकांची भलाई आपण करतो पण अंततः ती भलाई आपण नाही करत  तर तो ईश्वर करत असतो. अहंकारात तुम्ही लोकांकडून श्रेष्ठत्व प्राप्त करन्यात इश्वरापासून दूर व्हाल आणि लोकांना ही ईश्वरा पासून दूर कराल.(नहुजुल बलागाह प्रवचन77)

            काही उपाय सांगताना उपाय जर कामी नाही आले तर शास्त्र आणि धर्मावरून लोकांचा विश्वास उडणार. म्हणून योग्य दक्षता घ्यावे. लोकाना उपाय सांगतांना समजावून सांगावे की जे तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच होईल. जर तुमच्यासाठी योग्य नसेल तर हा काम होऊच शकणार नाही असा आपण सांगताना कोणाचा काम नाही झाले तर त्याचा विश्वास देव धर्म आणि शास्त्रांवरून उडाला नाही पाहिजे अशी दक्षता घेतली पाहिजे. आपण भक्ती आणि उपसनेतून मिळवलेल्या पुण्यच आपण सांगितलल्याे उपायांना फळ देणारे ठरणार म्हणून भक्ती आणि उपासना ही करत राहणे गरजेचे आहे हे कोणीही विसरु नये. ईश्वर आहे म्हणून त्याचा कडे लोकांना वळवा. आपले गुलाम बनवू नका.

              एका युद्धात जातांना ज्योतिषी अफीक इबन क़ैस यांनी हजरत अली अलैहिस्सालाम यांना सांगितले की या घडीला युद्धात जाणारा हारेल. या वर हजरत अली अलैहिस्सालाम यांनी सांगितले ‘ सिरू अला इस्मुल्लाह ‘ म्हणजेच ईश्वराचा नाव घेवून निघा म्हणून त्याच वेळेला निघाले आणि जिंकून ही आले.  ( हिंदी ग्रंथ, बलागाहनाहुजुल, प्रवचन नं. 77 )

           पैगंबर साहेबांचे सहावे उत्तराधिकारी इमाम जाफर सादिक अलैहिस्सालाम यांनी एक जमीन विकत घेत होते त्याच जमिनीचा अर्धा भाग एका ज्योतिषाला पण विकत घ्यायाचा होता पण जमिनीचा काही भाग चांगला होता काही भाग वाईट. असा ठरला की लकी ड्रॉ पद्धतीने वाटणी होईल. मग ज्योतिषाने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून पाहिले की उदाहरणार्थ सकाळी आठच्या आत शुभमुहुर्त असल्याने जे कोणी आठच्या आत घरातून बाहेर पडेल तो फायद्यात राहील नंतर घराबाहेर पडणाऱ्याला हानी होईल. त्याने आपल्या मित्रांना इमाम जाफर सादिक अलैहिस्सालाम यांचा कडे पाठवले आणि बाजावून सांगितले की आठच्या आत त्यांना बाहेर पडू देऊ नये. ते लोक त्यांना घरात गाठले आणि प्रश्न विचारत बसले त्यांना साडे आठ पर्यंत रोखून ठेवले ज्योतिषी मात्र शुभ मुहूर्तावर घरा बाहेर पडला. पण प्रत्यक्षात मात्र चांगल्या जमिनीचा भाग इमाम जाफर सादिक अलैहिस्सालाम यांना मिळाले आणि वाईट भाग ज्योतीशीच्या पदरी पडले. ज्योतिषाने इमाम जाफर सादिक अलैहिस्सालाम यांना विचारला की हे असा कसा घडला? काय माझा शास्त्र चुकीचे होते का किंवा मी  चुकलो? तर इमाम जाफर सादिक अलैहिस्सालाम यांनी सांगितले तुझा शास्त्र चुकीचे नव्हते आणि तू ही चुकला नाहीस. पण मला प्रेषित साहेबांनी शिकवलेली एक गोष्ट माझ्या लाभाचा कारण आहे तो कारण म्हणजे मी इथे येतांना एका भुकेल्या व्यक्तीला अन्न देऊन इथे आलो त्या पुण्याचं हा फळ आहे. या गोष्टीवरून आपल्या लक्षात येते की दान धर्म ग्रहांच्या दुष्परिणाम पण दार करतात.

            मी वाचलेली एक गोष्ट इथे सांगितले तर विषयांतर होणार नाही देवतांचे गुरू शुक्राचार्य आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवीत होते, काही विद्यार्थी खेळत होते तिथे एक ज्योतिषी आला विद्यार्थी त्याला विचारले तुम्ही कोण तर त्यांनी सांगितले की मी ज्योतिष शास्त्री आहे, मी व्यक्तीचा चेहरा पाहून त्या व्यक्ती बद्द्ल ज्योतिष सांगतो तर विद्यार्थी म्हणाले आमच्या गुरुदेवांबद्द्ल सांगा. मग ज्योतिषाने शुक्राचार्याबद्दल वाईट बोलला की हा माणूस धूर्त आहे, खोटारडा आहे, चारित्र्यहीन आहे, कपटी आहे वगैरे.. विद्यार्थी चिडले आणि ज्योतिषाला मारायला लागले हे पाहून शुक्राचार्य तिथे आले आणि विचारले की काय झाला तर विध्यार्थी गप्प होते. ज्योतिषाने हकिकत सांगितले तर शुक्राचार्य म्हणाले ” हा ज्योतिषाने खरा सांगितले पण त्यांनी माझा चेहरा पाहिले पण ईश्वराने दिलेली बुद्धी याने पाहिले नाही ज्याचा आधारे मी या वाईट गुणांवर मात करत आहे.” म्हणजे बुद्धीचा योग्य वापर स्वभावाला ही बदलण्यात मदत करणार.

            ज्योतिष शास्त्रावर शास्त्रीय पद्धतीने अत्यंत सोप्या भाषेत सांगितलेले ओशो रजनीश यांचा एक हिंदी भाषेतील पुस्तक ज्योतिष : एक अद्वैत शास्त्र प्रत्येकाने वाचले पाहिजे.

            शेवटी शास्त्र सिद्धी, साधना , आणि अध्यात्म आणि भक्ती यातला फरक मी हाजारो वर्ष वयाचे चांगदेव महाराज आणि किशोर वयातले ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा उदाहरण देऊन सांगू शकेल.चांगदेव पाशस्टी वाचले तरी ही माऊलिंचा श्रेष्टत्व आपल्या लक्षात येईल.

            प्रेषित साहेब आणि हजरत अली अलैहिस्सालाम यांनी स्वतःच्या ओळख बंदा म्हणजेच एक अल्लाहचा भक्त म्हणून करतांना अभिमान बाळगले म्हणून आध्यात्मिकता आणि भक्ती मार्गाला मी नेहमीच प्राधान्य देतो.

अल्लाहला समर्पित होऊन सत्काऱ्य करत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक शास्राचा पवित्र राखण्यासाठी प्रयत्न करू या.

          पंडित भगरे गुरुजींसारख्या महानियांसमोर बोलण्याचा धाडस केल्या बद्दल क्षमा असावे तसेच काही चुकले तरी क्षमा करावे. मला बोलावल्या बद्दल माझे विचार ऐकूण घेतल्या बद्दल आयोजकांचा आणि तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद.. जय हिंद, जय मानवता !!!

@ – आचार्य डॉ। मो. शकील जाफरी (मंचर) पुणे.

Previous Article

पुणे येथे नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक श्री.निलेश राणे यांचा जनसेवा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Next Article

९१ व्या बडोदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र गुर्जर यांचा १२ कलमी कार्यक्रम

You may also like