विद्यार्थी वस्तीगृहात झुंज प्रतिष्ठानची “आरोग्यम धनसंपदा..

Author: Share:

झुंज प्रतिष्ठानच्या कल्याण तालुक्यातील मामणोली येथील हिंदू सेवा संघ या विद्यार्थी वस्तीगृहात मुलांना रोगप्रतिकारक लस देण्यात आले. शिवाय मुलांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांबद्दलची माहिती व या दिवसात घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन डॉ. लक्ष्मी भंडारी ह्यांनी केले. तर हिंदू सेवा संघाच्या वस्तीगृहाशी आमचे फार जवळचे नाते आहे.

येथील व्यवस्थापन मंडळाने शिबिर राबविण्यासाठी केलेले सहकार्य ह्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. जेवढा वेळ आजची तरुणाई सोशल मिडीयावर राहण्यात व्यस्त घालवते त्याचा निम्मा वेळ जरी सामाजिक क्षेत्रामधे दिला तर भारताला विकसित देशांच्या पंगतीत बसायला जास्त काळ लागणार नाही. असं मत झुंज चे शिलेदार विकास म्हारसे यांनी व्यक्त केले.

झुंज प्रतिष्ठानने राबवलेल्या कार्यक्रमात झुंजच्या डॉ. लक्ष्मी भंडारी, परेश भंडारी, मनीष कारभारी ,विष्णू कोर, विकास म्हारसे, सुदर्शन मिरकुटे, अविनाश पोढेकर, विशाल मिरकुटे, लक्ष्मण राऊत, नरेश उंबरे, मुकेश ठाकूर, प्रवीण कालंन, ओंकार साळवी, वैभव भोये, स्वप्नील भोईर, आर्या ज्यॉयल, अविनाश कालंन, गंगाराम कनौजा, वसंत भोये तसेच रूपेश पठारे आदी शिलेदार उपस्थित होते.

Previous Article

येवला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची १ कोटी ७५ लाखांची १८ कामे मंजूर

Next Article

११ जुलै रोजी नाशिक येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्ह्यातील चेअरमन, संचालकांचा मेळावा

You may also like