नांदगाव-साकोरा येथे महाअवयवदान महोत्सव जनजागृती रँली

Author: Share:

साकोरा (प्रतिनिधी) – नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाअवयवदान महोत्सव जनजागृती अभियानांतर्गत क.भा.पा विद्यालय, पेडकाई माता माध्यमिक विद्यालय तसेच जि.प. केंद्रशाळा आदि ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन अवयवदानाची सामुहिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये विषेश ग्रामसभेचे आयोजन करून नांदगाव प.स.चे गटविकास अधिकारी जे. टि. सुर्यवंशी यांनी महाअवयवदान महोत्सवाची माहिती दिली.

आपल्या प्रियजणांच्या मृत्यूनंतर अवयवदान करून असाह्य रुग्णांचे प्राण वाचवून त्यांचे जीवन सुखरूप करण्यासाठी त्वचा,ह्दयाच्या झडपा, दान करू शकता.या दानाचा प्रचार व प्रसिद्धी करणे काळाची गरज असून अवयव प्रत्यारोपण करून दुसर्‍या जिवाला जीवदान देण्याची संधी घेवू शकतो असे ग.वि.अ. सुर्यवंशी यांनी सांगितले. त्यानंतर परिसरातील सर्व शाळेत पशुधन अधिकारी चित्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती देवून जनजागृती करण्यासाठी गावातून हातात माहिती असलेले फलक व घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी, सेवक, मदतनीस, आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी सामुहिक शपथ घेतली. शेवटी ग्रामविस्तार अधिकारी सरोदे बी बी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

शेलारांनी उद्धव ठाकरेंना म्हटले उद्धट; पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे?

Next Article

रिझर्व्ह बँकेचा अहवाल: ९९% जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

You may also like