जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड

Author: Share:
नाशिक(उत्तम गित): जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड करण्यात आली असून योजनेतील महत्वाचा टप्पा असणारी शिवार पाहणी नुकतीच झाली असून यानंतर कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

राज्यात सतत उध्दवणारी पाणी टंचाईची परीस्थिती विचारात घेवुन ‘पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र ‘ अंतर्गत ‘ जलयुक्त शिवार अभियान ‘ शासनाने हाती घेतले असुन यामध्ये निफाड तालुक्यातुन मरळगोई बुद्रुक गावासह एकुण १८ गावांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये मरळगोई बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत सात नवीन बंधारे, नऊ बंधारा दुरुस्ती,शिव नदी वरील पाच बंधारे दुरुस्ती आणि दोन नवीन बंधारे,गोई नदीवर 2 दुरुस्ती,2नवीन,गाढवे नाल्यावरील सर्व बंधाऱ्यांची खोलीकरण आदी कामांचा समावेश होणार आहे.

या शिवार फेरी प्रसंगी सरपंच लता जगताप,कृषी विभाग मंडल अधिकारी मुद्रेवार,कृषी सहाय्यक शिंदे,ग्रामसेवक शरद व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

Previous Article

शहापूर मधील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात पार पडला संविधान जनजागृती कार्यक्रम… 

Next Article

‘चला, वाचू या’च्या ३१ व्या पुष्पामध्ये अश्विनी मुकादम व ‘अथांग आवली’

You may also like