जैन मुनींनी संजय राऊतांना झापले; तुझ्या आईने तुला संस्कार दिले नाहीत.

Author: Share:

मुंबई: जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी संजय राऊत यांना झापलं आहे. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपने मिळविलेला विजय हा ‘मुनी आणि मनी’मुळे होता. जैन मुनी हा अतिरेकी असून त्याला ठेचला पाहिजे, अशी कडवी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

पाहा काय म्हणाले जैन मुनी. या लिंकवर क्लिक करा:
https://www.youtube.com/watch?v=IW4cUroN19Y

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मुंबईवर राज्य केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण, हा तुझ्या आईने तुझ्यावर संस्कार केले नाहीत का? असे मुनींनी म्हटले आहे. संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली, अशा शब्दात जैन मुनी राऊतांवर घसरले आहेत.

Previous Article

ग गणपतीचा…

Next Article

मेसेंजर ऑफ गॉड निघाला मेसेंजर ऑफ इव्हील; अनुयायांची गुंडगिरी.

You may also like