सर आयझॅक न्यूटन

Author: Share:

सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म २५ डिसेंबर १६४२ साली वुल्झथॉर्प (लिंकनशर) येथे झाला. न्यूटन यांच्या जन्माच्या दोन महिने आधीच त्यांचे वडील वारले. त्यांच्या पूर्वजांचा शेतीचा व्यावसाय होता. न्यूटन यांचे सुरुवातीचे शिक्षण ग्रॅथम येथील शाळेत झाले.

बालपणातचं त्यांनी लहान चक्की (उंदराने चालवलेली), घड्याळे, कंदील या वस्तू बनविल्या होत्या. शेतीकामासाठी त्यांच्या आईने न्यूटन यांना शाळेतून काढले. परंतू मामा व शिक्षकांच्या सल्लायाने १६६० साली परत शाळेत पाठविण्यात आले. न्यूटन १६६१ साली केंब्रिज येथील ट्रिनिटी महाविद्यालयातून मॅट्रिक झाले. १६६५ साली बी. ए. झाल्यानंतर ट्रिनिटी महाविद्यालयाचे फेलो म्हणून निवड झाली. १६६५ नंतर सुमारे प्लेगच्या साथीमुळे विद्यापीठ बंद होते. या काळावधीत न्यूटन यांना वुल्झथॉर्प येथे रहावे लागले. या वेळेत त्यांनी गणित, प्रकाशकी व खगोलीय यामिकी या विषयांतील कामगिरीचा पाया घातला.

१६६८ साली एम. ए . पदवी संपादीत केली. न्यूटन यांचे गुरु आयझॅक बॅरो यांनी न्यूटन मध्ये असलेले गुण हेरले होते. १६६९ साली बॅरो यांनी केंब्रिज विद्यापीठातून आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्या वेळेस न्यूटन यांची त्या रिक्त पदावर निवड करण्यात आली. त्यावेळी न्यूटन यांचे वय केवल २६ वर्ष होते. १६८९ साली केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत त्यांची निवड झाली. १७०१ साली परत त्यांची निवड झाली. परंतू राजकारणात त्यांनी सक्रीय भाग घेतला नाही.

१६९० साली संसद विसर्जित झाल्याने न्यूटन यांनी काही काळ गणितावर संशोधन केले. १६९२ ते ९४ या दोन वर्षांच्या कालावधीत निद्रानाश व मानसिक त्रासाने ग्रासल्याने कामात खंड पडला. केंब्रिजमधील जीवनाचा कंटाळा आल्याने तिथून बाहेर पडण्याच्या विचारात होते. १६९६ साली अर्थमंत्री चाल्स मॉंटाग्यू यांनी न्यूटन यांची टाकसाळीमध्ये अधीक्षकस म्हणून नेमणूक केली. तेथे चार वर्षांने न्यूटन मुख्याधिकारी झाले. अधीक्षक पदावर असताना न्यूटन केंब्रिज विद्यापिठात प्राध्यापक होते. परंतू मुख्याधिकारी होताच त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला व ते लंडन येथे स्थायिक झाले.

अवकलन व समाकलन यांची निर्मिती केल्याने गणितशास्त्रात न्यूटन यांनी महत्तवाची कामगिरी बजावली. अवकलनांकाला त्यांनी “फल्कशन” हे नाव दिेले. ते दर्शवण्यासाठी त्यांनी शिरोबिंदूचा उपयोग केला. समाकलानाचा उपयोग वक्राने वेढलेले क्षेत्रफळ व घन आकृत्यांचे घनफळ मिळविण्याकरीता केला.

न्यूटन यांचे सर्वात महत्तावाचे काम म्हणजे त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्वाकर्षाणाची थोडीशी कल्पना न्यूटन यांच्या आधीच्या शास्त्रज्ञांनाही होती. परंतू नियमाद्वारे यांनी निश्चित स्वरुप दिले. विश्वातील दोन कणांमध्ये आकर्षक प्रेरणा ही वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हे न्यूटन यांनी स्पष्ट केले. न्यूटन यांनी गोलाची त्याच्या वस्तूमानावरील आकर्षण प्रेरणा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये केंद्रित झालेली आहे असे मानता येते हि सिद्ध केले.

“थंड होत असलेला पदार्थाचा थंड होण्याचा दर हा त्याच्या व भोवतालच्या तापमानात असलेल्या फराकावर अवलंबून असतो” हा शीतलीकरणाचा नियम न्यूटन यांच्या नावाने ओळखला जातो. न्यूटन यांचा मॅथेमॅटीकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी हा ग्रंथ १६८७ साली प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथाच्या पहिल्या भागात गतिकीचा गणितीय दृष्टीकोनातून विकास केलेला आहे. या ग्रंथामुळे न्यूटन यांची किर्ती सर्वत्र पसरली. या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व टीकाग्रंथ प्रसिद्ध झाले. या ग्रंथाचे श्रेष्ठत्व वैज्ञानिक जगतात अबाधित राहिले.

आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली, असे मानले जाते. OPTICKS हा त्यांचा दुसरा ग्रंथ १७०४ साली प्रसिद्ध झाला.

न्यूटन १६७२ पासून रॉयल सोसायटीचे सदस्य होते. १७०३ मध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष झाले. पॅरिस येथील सायन्य अॅकेडमीने १६९९ साली त्यांना सन्मान्य सदस्यत्वाचा बहुमान बहाल केला. १७०५ साली अॅन राणीने त्यांना नाईट ( सर ) हा किताब दिला. त्यांचा मृत्यू २० मार्च १७२७ ला लंडन येथे झाला परंतू विशेष सन्मान म्हणून त्यांच्यावर अंतिम संस्कार हेवेस्टमिन्स्टर अॅबमध्ये करण्यात आले.

Previous Article

अॅट्रोसिटी कायद्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

Next Article

मर्ढेकरांच्या कविता

You may also like