Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

तुमचा शेअर पोर्टफोलिओ फ्युचर रेडी आहे काय?

Author: Share:

मागे काय घडले याचा फायदा पुढे काय होऊ शकते याचा अंदाज बांधण्यासाठी होतो. मात्र त्यासाठी, सर्व परिस्थिती सामान असणेही आवश्यक असते. म्हणजे मागील तीन वर्षे एखाद्या कंपनीला राजकीय किंवा व्यावसायिक दृष्टया अनुकूल होती म्हणून त्या कंपनीची भरभराट झाली, पण समजा लोकांची आवड बदलली आणि कंपनीच्या उत्पादनांना मागणी घटली तर त्याच कंपनीचा परफॉर्मन्स गडबडणार हे नक्की! दुसरीकडे बदललेली परिस्थिती एखाद्या दुसऱ्या कंपनीसाठी अनुकूल होऊ शकते जिचा परफॉर्मन्स मागील पाच वर्षी इतका चांगला असेलच असे नाही. इंडस्ट्री बदलत असते. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणेच हे होते, जुने जे टिकून राहू शकत नाही ते संपून जाते. नवीन कंपन्या, नवीन इंडस्ट्री जन्माला येतात. बदलत्या तंत्रज्ञान आणि आर्थिक अर्थशास्त्रीय घटनांचा कंपन्यांवर परिणाम होत असतो. गुंतवणूकदाराने ह्या सर्वांचा विचार करणे आवश्यक असते. म्हणूनच आपण शेअर गुंतवणूक करताना फ्युचर रेडी असणे आवश्यक आहे.दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे आवश्यक आहे. तुमचा पोर्टफोलिओ फ्युचर रेडी आहे काय?

सध्या ऑटोमेशनचा जमाना आहे. ऑटोमोबाईल, शेती, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रातील कंपन्यांवर ह्याचा फार मोठा परिणाम होणार आहे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नावाचा बदलाचा वर संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वरून फिरतो आहे. रोबोटिक्स आहे. तुमच्या गुंतवणूक रडार मध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग. रिटेल आणि होलसेल ट्रेंड, कन्स्ट्रक्शन, फूड सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल कंपन्या असतील तर ह्या बदलला त्या समोरचे जाताहेत का हे पाहणे आवश्यक आहे. महिंद्रा आणि महिंद्रा हि ट्रॅक्टर व्यवसायातील कंपनी, अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. जीपीएस सिस्टीमचा वापर करून ते मानवविरहित ट्रॅक्टर बनवत आहेत.  मारुती सुझुकी हि ऑटोमोबाईल मधील बलाढ्य कंपनी सुद्धा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून आपल्या उत्पादनात बदल करू शकते. सध्या नवीन येणाऱ्या गाड्यांमध्ये आपल्याला हे दिसून येत आहेच. अर्थात तंत्रज्ञान बदलाचा फायदा तंत्रज्ञान कंपन्यांना मिळणार. त्यामुळे एलएन्डन्डटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ही कंपनी आमच्या रडारवर आहे.एबीबी हि अशीच एक महत्वाची कंपनी. इंजिनिअरिंग कन्सल्टिंग, इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, टेक्निकल सपोर्ट ह्या क्षेत्रात असलेली ही कंपनी. इनोव्हेशन आणि प्रगत मॅन्युफॅक्चरिंग ह्यावर सध्या तिचे काम चालू आहे. सध्या १३०० च्या घरात आहे. तिसऱ्या तिमाहीत तिचा नफा ३०% ने वाढला आहे.

क्लीन टेक्नॉलॉजी अर्थात ग्रीन टेक्नॉलॉजी आणि पर्यावरणासाठी मैत्रीचे ठरणारे तंत्रज्ञान पुढील काळात महत्वाचे ठरणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सोलर एनर्जी हे पुढील काळातील उत्तर असेल. कार्बन एमिशन हा जगभरातील महत्वाचा प्रश्न आहे. भारत या बाबतीतही पुढे आहे आणि पॅरिस करारानुसार २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन ३०-३५% ने कमी करण्याचा प्रयत्न भारत करणार आहे, दुसरीकडे तेल आयातीवरील भारताचा वाढत खर्च पाहता, देशभरातील तेल उत्पादनावर भारत अधिक लक्ष देईल. खनिज तेल समवेत नैसरगिक गॅस हि सुद्धा भारतासमोरची महत्वाची समस्या आणि कंपन्यांसमोरची मोठी संधी आहे. एबीबी इंडिया इथेही जी सोलर इन्व्हर्टर्सची निर्मिती करते आणि पेट्रोनेट एलएनजी ह्या दोन मोठ्या कंपन्या यासाठी रडारवर आहेत.

शेती आणि शेतीतील तंत्रज्ञान हा सुद्धा एक मोठा विषय येणाऱ्या काळात राहणार आहे. माणसाची गरज अन्न आणि माणसाची वाढती संख्या पाहता, उपलब्ध जमिनीतून अधिक उत्पादन काढण्याची नितांत आवश्यकता आहे. दुसरीकडे अधिक उत्पादनासाठी केमिकल्सचा मारा करून आपण जमिनी नापीक जाणीव अन्न विषारी बनवतो आहोत हेही मानवाच्या लक्षात आले आहे. अर्थातच तंत्रज्ञान हेच माणसाच्या मदतीला धावून येईल हे मानवाच्या लक्षात आले आहे आणि यासाठी तो प्रयत्न करतो आहे.योग्य तंत्रज्ञानाचा वापर उत्पादकता ३०% वाढवतो आणि २०% ने खर्च कमी करतो असे फिक्कीचा रिपोर्ट सांगते. त्यामुळे शेतीसाठी योग्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे संशोधकांचे महत्वाचे ध्येय आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे, शेतीसाठी बजेट मधील वाढती प्रोव्हिजन, कृषी सिंचाई आणि सॉईल हेल्थ कार्ड अशा अनेक शासकीय योजना यातून शासन शेती बाबतीत गंभीर आहे हे समजते. त्यामुळे शेती क्षेत्रात तुम्ही पैशाची पेरणी करणे गैर नाही. ट्रॅक्टर निर्मितीतीतील महिंद्रा आणि महिंद्रा, सिंचन क्षेत्रातील जैन इरिगेशन, हायब्रीड सीड्सची निर्मिती करणारी कावेरी सीड्स, पंप मॅन्युफॅक्चर मध्ये किर्लोस्कर, केएसबी पंप आणि फिलोलेक्स यामध्ये तुम्ही निवड करू शकता.

अजून दोन परस्पविरोधी वाटणारे पण भारतीय समाजात घडत असलेले बदल इथे नमूद केले पाहिजेत. एक म्हणजे वाढत्या उत्पन्नासोबत वाढते कंझम्पशन आणि त्यातून लक्झरी प्रोडक्ट्सची वाढती मागणी. ह्यामध्ये तुम्ही इशर मोटर ह्या कंपनीकडे पाहू शकता. त्याच्याच विरुद्ध म्हणजे, लक्झरी वाटणारी विमान उड्डाण ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्यात आणून देण्याचा सरकारचा उडाण योजनेत प्रयत्न आहे. यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन आणि स्पाईसजेट ह्या दोन स्वस्त उड्डाण देणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे फायदा होऊ शकतो.

शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आवश्यक अशा अनेकविध बाबींवर स्मार्ट महाराष्ट्र मधून आपण चर्चा करत असतोच. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फ्युचर रेडी असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कुठल्या क्षेत्रांमध्ये ‘विकास’ दिसू शकतो त्यातील ह्या निवडक. अजूनही काही कंपन्या आणि क्षेत्रे सांगता येतील आणि त्या आपल्या पुढील लेखांमध्ये येतील. याशिवाय, शेअर आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबतीत विविध लेख आणि चर्चा याद्वारे विविध माहिती आणि संशोधन तुमच्यापर्यंत आणत राहूच. तेंव्हा वाचत राहा स्मार्ट महाराष्ट्र!

संदर्भ: वेल्थ इनसाईट रिसर्च
         बीएसई वेबसाईट
         कंपनी वेबसाईट

 

Previous Article

१८ नोव्हेंबर 

Next Article

१७ नोव्हेंबर 

You may also like