५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, वाचा सर्वसामान्यांसाठी अजून काय बेनिफिट आहेत?

Author: Share:
अंतरिम बजेट मध्ये नाही म्हणता म्हणता पियुष गोयल यांनी पाच लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. निवडणुकीअगोदर सरकार करदात्यांना खुश करण्याचा प्रयत्न करेल हे स्वाभाविक होते. त्यामुळे अंतरिम बजेटमध्ये कर वजावट करता येत नाही या सिद्धांताला बाजूला सारून सरकारने ही कर वजावट जाहीर केली. विशिष्ट गुंतवणुकीवर असेलला दीड लाखांचे डिडक्शन लक्षात घेतले तर साडे सहा लाखापर्यंत आणि होम लोनवरील कर वजावट लक्षात घेतली तर अधिकच्या उत्पन्नाला हा लाभ मिळेल. अर्थात या योजनांचा विरोधी पक्ष कसा विरोध करतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
काय आहेत थेट करतील तुम्हाला बेनिफिट देतील अशा गोष्टी
१. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना कर लागणार नाही. दीड लाखांच्या गुंतवणुकीवरील मर्यादा लक्षात घेतली तर साडे सहा लक्ष आणि गृहकर्जावरील मर्यादा पाहता त्याहून अधिक उत्पन्न करमुक्त होईल.
२. स्टॅंडर्ड डिडक्शन ची मर्यादा ४० हजार वरून ५० हजार केली आहे.
३. बँक डिपॉसिट वरील टीडीएस लागण्याची मर्यादा १० हजार वरून वाढवून ४०,००० केली आहे.
४. भाड्यावरील टीडीएस ची मर्यादा १,८०,००० वरून २,४०,००० केली.
५. कॅपिटल टॅक्स मधून सूट एका घरावरून दोन घरावर केली.
६. स्वतःच्या मालकीची दोन घरे असतील तर दुसऱ्या घरावर असलेला कर माफ करण्यात आला आहे.
Previous Article

रमेश भाटकर

Next Article

२४ जानेवारी १९५०: ‘जन गण मन’ ला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता

You may also like