Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

इन्फोसिस चा समभागधारकांना बायबॅकचा सुखद धक्का

Author: Share:
इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शिका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर ढासळलेल्या इन्फोसिसच्या समभागांची कंपनीने पुनरखरेदी (बायबॅक) करण्याची तयारी दाखवल्याने दलाल स्ट्रीट सुखावले आहे. ११५० रुपये प्रति समभाग प्रमाणे हे समभाग खरेदी केले जातील. हा निर्णय संचालक मंडळाने आधी घेतलेला असू शकेल. पण शुक्रवार ९% कोसळून ९२३ वर बंद झालेल्या इन्फोसिसचाय समभागधारकांना ११५०/- रुपये प्रति समभाग हा सुखदच धक्का म्हणावा लागेल. 
कंपनीने मुंबई स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या रीलिजमध्ये हे नमूद केले गेले आहे.  हि ऑफर १३००० कोटींची असून कंपनीच्या पेड अप कॅपिटल आणि फ्री रिझर्व्ह च्या २०% आहे. सन २०१८मध्ये लाभांश किंवा शेअर बायबॅकच्या माध्यमातून आपल्या शेअरधारकांना लाभ मिळवून देण्याची घोषणा कंपनीने या वर्षीच्या एप्रिल महिन्यात केली होती. संभागधाकांनी मंजुरी मिळाल्यानंतर ऑफरचे वेळापत्रक व इतर माहिती जाहीर होईल.
इन्फोसिसची पहिलीच बायबॅक ऑफर आहे. या आर्थिक वर्षातील ही दुसरी मोठी बायबॅक ऑफर असून एप्रिलमध्ये दुसरी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) १६ हजार कोटी रुपयांची बायबॅक ऑफर दिली होती.
Previous Article

कळवा स्टेशनच्या विकासाचा मार्ग  

Next Article

पंचतारांकित हॉटेल्स टाळा: पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी

You may also like