स्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये श्रमजीवी युवकांचे जंबो शिष्टमंडळ

Author: Share:

*२०० खाटांचे भिवंडी सिव्हिल हॉस्पिटल कागदावरच*

*हॉस्पिटलमधील धक्कादायक गोष्टींचा पंचनामा*

*बारा पैकी चार डॉक्टर मंत्रालय आणि इतर ठिकाणी प्रतिनियुक्तीवर*
*कमी स्टाफवर अधिकच्या कामाचा ताण*

*श्रमजीवी रुग्ण मित्र फलकाचे अनावरण*

भिवंडी प्रतिनिधी: आज भिवंडी येथील स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात (सामान्य रुग्णालय) येथे श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी शिष्टमंडळाने जाऊन प्रशासनाला चांगलाच हादरा दिला. प्रत्येक मुद्यावर मुद्देसूद चर्चा करून,प्रत्येक तरुण कार्यकर्त्याने एक एक समस्येवर चर्चा करत येथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यापुढे येथे एकही रुग्णाची हेळसांड होणार नाही, उपचार नाकारला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी यावेळी दिली. धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांबात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे रुग्णाची हेळसांड होते, उपचार नाकारून अनावश्यकरित्या पुढे रेफर केले जाते. रुग्णांकडून पैसे घेतले जातात अशा अनेक तक्रारी होत्या. याबाबत मोर्चा जाहीर करण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील श्रमजीवीचे तरुण आणि त्यांच्या सोबत ज्येष्ठ कार्यकर्ते असे तब्बल 50 जणांचे शिष्टमंडळ हॉस्पिटल प्रशासनाला भेटले. यावेळी येथील प्रशासनाच्या असंवेदनशील वर्तवणुकीच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. यावर प्रत्येक तक्रारींचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

यापुढे तक्रारीची वेळ येणार नाही असे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अश्वसित केले. त्यानंतर येथील चार डॉक्टर चक्क प्रतिनियुक्तीवर बाहेर आहेत, येथे डॉक्टर ची नितांत गरज असताना असे प्रतिनियुक्तीवर मंत्रालय आणि उच्च न्यायालयात नियुक्ती केल्याबाबत श्रमजीवी ने संताप व्यक्त केला. याबाबत तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. 5 वर्ष पूर्वी या हॉस्पिटल ला 200 खाटांच्या सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. मात्र हे श्रेणीवर्धन केवळ कागदावरच राहिले. येथील इमारत 30 वर्ष जुनी आहे , शवागराची अवस्था बिकट आहे, प्लांबिंग लाईन सडली आहे, याबाबत कोणतीहि दुरुस्ती का केली जात नाही याचाही जाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. या सर्व धोरणात्मक प्रश्नांवर शासन राज्यस्तरावर बैठक घेण्याचे डॉक्टर थोरात यांनी सांगितले.

तरुणांच्या आंदोलनाच्या शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर उपाध्यक्ष अशोक सापटे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांच्या सह सर्व तरुण श्रमजीवींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी शहर युवा अध्यक्ष मुकेश भांगरे , ग्रामीण युवा अध्यक्ष जयेश पाटील ,उपाध्यक्ष रविंद उगले आणि ललित शेळके, सचिव अनिता वाघे, सह सचिव विजय रावते, अमोल सवर, किशोर हुमने यांच्यासह तरुणांनी प्रत्येक मुद्दा या शिष्टमंडळात मांडला. यावर डॉक्टर अनिल थोरात, डॉ.शेटे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिली. यावेळी संघटनेच्या जया पारधी,संगीता भोमटे, गणपत हिलीम,सुनील लोने ,सागर देसक, मोतीराम नामकुडा, दुष्यंत घायवट, जयेंद्र गावित ,आशा भोईर, गुरुनाथ वाघे, लक्ष्मी मुकणे, कमळ गुलूम, भानुदास भोईर, हिरामण गुळवी, केशव पारधी,अविनाश भोईर, कल्पेश जाधव, रोहित पाटील ,वैशाली पाटील, सविता पाटील यांच्यासह 50 कार्यकर्ते आणि इतर सभासद सहभागी झाले होते.

*श्रमजीवी रुग्ण मित्र फलक अनावरण*

यावेळी येथील रुग्णांना कोणत्याही अडचणी येत असतील तर सहाय्यासाठी *श्रमजीवी रुग्ण मित्र* फलक लावून त्याचे अनावरण जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर ,उपाध्यक्ष अशोक सापटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावर सर्व युवकांचे संपर्क नंबर असतील, रुग्णलयाच्या कॅम्पस मध्ये हे फलक लावण्यात आले.

Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ६

Next Article

लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न

You may also like