Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पहिल्या वन-डेत भारत विजयी, धवनचे शानदार शतक

Author: Share:

शिखर धवनचे शतक आणि आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने ९ गडी राखून मात करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

सलामीवीर शिखर धवनने केवळ ९० चेंडुंमध्ये १३२ धावांची आक्रमक खेळी केली.  या  खेळीत तब्बल २० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सलामीवीर रोहीत शर्मा चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद होऊन  झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनला दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. कोहलीने आज अर्धशतक झळकावत ८२ धावांची खेळी केली. कोहलीने आपल्या खेळीत १० चौकार आणि एका षटकार लगावला.

तत्पूर्वी श्रीलंकेचा डाव अवघ्या ४३.२ षटकात २१६ धावांवर आटोपला. अक्षर पटेल ने ३४ धावत तीन बळी घेतले. तर केदार जाधव, चाहूल आणि जसप्रीत बुमराह ने प्रत्येकी २ बळी घेतले. सलामीवीर डिकवेल ने ६४ धाव बनवल्या. गुंथिलक, मेंडिस आणि अँजेलो मॅथ्यूस ने प्रत्येकी ३५ धाव बनवल्या. याव्यतिरिक्त कुणीही श्रीलंकन फलंदाज टिकला नाही.
Previous Article

२१ ऑगस्ट

Next Article

मुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन!

You may also like