Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीमध्येही भारताचे पारडे जड

Author: Share:

दोन कसोटी सामने जिंकून मलिक खिशात टाकलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाने, श्रीलंकेविरुद्ध तिसर्या सामन्यातही जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

हार्दिक पंड्याच्या तडाखेबंद शंभरीच्या जोरावर, भारताने पहिल्या इनिंग मध्ये ४८७ धावा केल्यावर, श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १३५ धावत गुंडाळला. फॉलो ऑन देऊन त्यांना पुन्हा फलंदाजीला पाचारण केल्यावर उमेश यादवने उपल तरंगांचा त्रिफळा उडवल्याने, दुसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेची अवस्था एक बाद एकोणीस अशी झाली आहे.

हार्दिक पंड्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९६ चेंडूत १०८ धावांची तडाखेबंद आणि रेकॉर्डब्रेक खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि तब्ब्ल ७ षटकार लगावले. कुलदीप यादवने २६ धावांची खेळी करत त्याला उत्तम साथ दिल्याने भारत कालच्या ६ बाद ३२६ वरून ४८७ धावांची मजल गाठू शकला. काल सलामीवीर शिखर धवन ने १३५ चेंडूत ११९ धावांची आणि लोकेश राहुल ने १३५ चेंडूत ८५ धावांची खेळी रचून भारताला दणकून सुरुवात करून दिली होती. कर्णधार कोहलीच्या ४२ धावा वगळता बाकीचे फलंदाज लवकर परतल्याने भारताची ६ बाद ३२६ अशी अवस्था झाली होती.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम खेळ करत श्रीलंकेचा डाव १३५ धावत गुंडाळला. कुलदीप यादव ने ४० धावत ४ घेऊन श्रीलंकेच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. त्याआधी महंमद शमी ने १७ धावत २ बळी घेत सलामीवीरांना खिंडार पाडले होते. अश्विन ने २ तर पंड्याने १ बळी घेतला.
वेगवान गोलंदाज उमेश यादवला पहिल्या डावात एकही बळी मिळाला नाही. त्याने ती कसर दुसऱ्या डावात पहिलाच बळी घेत भरून काढली आहे.
अजूनही श्रीलंका ३३३ धावांनी पिछाडीवर असून भारत डावासहित सामना खिशात घालतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे!

Previous Article

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुंबईच्या शार्दूल ठाकूरची निवड

Next Article

गोवा – माझ्या नजरेतून

You may also like