Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

इस्राईलच्या राजकारणाकडे बघताना

Author: Share:

इस्राईल ८८.०७ लाख लोकसंख्या असलेला छोटासा देश. छेत्रफळाच्या दृष्टीने जगात १५० वा क्रमांक आहे.भारतासारच्या मानाने अगदीच लहान असलेला हा देश मूर्ती लहान पण कीर्ती महान अशाच स्वरूपाचा आहे.भारतासारखाच विविधतेने नटलेल्या या देशात ७५ % ज्यू अन २०% अरब मुस्लिम तसेच क्रिस्ती आणि द्रुज आहेत.

इस्राईलने भारताप्रमाणेच लोकशाही स्वीकारली असली तरी इस्राएल राजकारणामध्ये मुख्यत्वे झिओनिस्ट चळवळीचा प्रभाव राहिला आहे.ज्या प्रमाने डावी आणि उजवी विचारसरणी भारतात आहे त्याच प्रमाणे इस्राईल देशात हि आहे. प्रारंभी या देशात मजूर पक्षाची स्थापना झाली.शांतता आणि विरोधी लष्करवादि असं दोन गट होते.१९१९ मध्ये बेन गुरियन आणि गैर मार्क्सवादी पक्ष या उजव्या लोकांनी कामगार संघटनची स्थापना केली.१९३० मध्ये कामगार संघटन आणि युवा कार्यकर्ता पार्टी यांनी कामगार पार्टीत विलीनीकरण केले.कामगार पार्टीचा मजूर झिओनिझ्म मध्ये समावेष होतो.पहिल्या नेसेट मध्ये डाव्या आघाडीचे वर्चस्व होते.

संशोधनवादी झोईनिझम (पुरातनवादी) हि झिओनिझ्म चळवळीतील एक गट आहे. प्रभावशाली समाजवादी मजूर झिओनिझ्म मुख्य वैचारिक प्रतिस्पर्धी होते. झिओनिझ्म चळवळीच्या या उजव्या गटातूनच लिकुड(एकत्रीकरण)पार्टीची स्थापना झाली. १९३५ मध्ये झिओनिस्ट प्रतिनिधीने जांबितिस्कीच्या राजकीय कार्यक्रमास नकार दिला आणि ज्यूच्या नवीन राष्ट्र निर्मितीला विरोध केला तेव्हा जांबितिस्कीने वर्ल्ड झिओनिस्ट ऑरगॅनिझशनचा राजीनामा दिला. न्यू झिओनिस्ट ऑरगॅनिझशनची स्थापना केली.

धार्मिक झिओनिझ्म हि तीन तत्वांवर आधारित होती इस्राएल भूमी,इस्राएल लोक आणि इस्राएल तोराह. धार्मिक झिओनिझ्म ह्या विचारधारेत झिओनिझ्म आणि ऑर्थोडॉक्स ज्यूडिशनचा समावेश आहे.इस्राएल राज्याच्या स्थापनेपूर्वी धार्मिक झिओनिजम मध्ये प्रामुख्याने यहूदीच होते. जे इस्रायल भूमीमध्ये एक ज्यू राष्ट्राची उभारणी करण्यासाठी झीयोनिस्ट प्रयत्नांचे समर्थन करत होते. सहा दिवसांच्या युद्धनंतर आणि पश्चिम किनाऱ्यावर कब्जा केल्यानंतर, धार्मिक झिओनिझ्म चे रूपांतर उजव्यांच्या बाजूने निओ झिओनिझ्म मध्ये झाले.

भारताप्रमाणेच इस्राएल लोकशाही स्वीकारली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी १८ वर्षे वय लागते. नेसेटने विधानसभेला कोणालाही मत नाकारण्याचा अधिकार दिला आहे पण अजून पर्यंत तो अधिकार विधानसभेने वापरलेला नाही. राज्यातील राष्ट्रपती, राज्य नियंत्रक, न्यायाधीश किंवा डेनामीन, करिअर अधिकारी आणि वरिष्ठ नागरी सेवक यासारख्या काही अधिकृत पदांवर असणाऱ्या व्यक्ती नेसेटच्या निवडणुकीसाठी उभे राहू शकत नाहीत. तथापि, कायद्याने निर्दिष्ट केल्याप्रमाणे सार्वजनिक पदांच्या आधारावर ते निवडणुकीपूर्वी 100 दिवस किंवा 6 महिने आधी त्यांच्या पदावरून राजीनामा देतील तेव्हा ते लढू शकतात. इस्राएलची निवडणूक पूर्ण गुप्त पद्धतीने होते. नेसेट दर चार वर्षांनी विसर्जित होते .

पंतप्रधान लवकर निवडणुकीसाठी राष्ट्रपतींना सूचित करू शकतात पण नेसेट त्याला विरोध करू शकते. १९५१,१९८१,१९८४,१९९२,१९९६,१९९९,२००६,२००९ या सर्व निवडणूका नियोजित वेळापत्रकाच्या पुढे ढकल्यात आल्या होत्या पंतप्रधानांच्या पुढाकारानुसार १६ ने सेटची निवडणूक पुढे ढकळण्यात आली होती . नेसेट सदस्य नेसेटचा कार्यकाळ बहुमताने वाढवू शकतात. १९७३ च्या निवडणुकीतहि असेच घडले होते यम किपूर युद्धामुळे निवडणुकीचा कार्यकाळ पुढे ढकला होता. पक्ष कायदा १९९२ नुसार , नोंदणीकृत पक्षांनाच निवडणूक लढवता येते.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांचा गट नोंदणी करून निवडणूक लढऊ शकतो. प्रत्येक पक्षाला एका विशिष्ट क्रमाने उमेदवारांचे नाव निवडणूक आयोगाला द्यायचे असतात. हि उमेदवारांची यादी सादर करू शकतात. पंधराव्या ने सेट च्या निवडणुकीत इस्राएलचे ३ गट बनले होते. श्रम, गेशर, निमद .पंधराव्या संयुक्त अरब लिस्टचे दावेदार , इस्लामिक मुमेंटचे दावेदार हे नोंदणीकृत असून हि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. कारण ज्यू राष्ट्राची किंवा त्यांच्या लोकशाही पद्धतीच्या विरुद्ध इस्राएल राज्याच्या अस्तित्व विरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्येकक्ष कार्य करणाऱ्यांना निवडणुकीत सहभाग घेता येत नाही.

नेसेटच्या पात्र सदस्यांची संख्या मतांच्या विभागणीनुसार निश्चित केली आहे. नेसेट च्या सदस्यांची संख्या १२० निर्धारित केली आहे. एका पक्षाला निवडून येण्यासाठी एकूण मतांच्या ३.२५ % मते मिळायला हवीत. कुठल्याही पक्षाने दिलेली उमेदवारांची यादी ज्या क्रमाने दिली आहे त्या क्रमाने उमेदवार निवडले जातात. म्हणजे जर एखाद्या पक्षाला १० जागांसाठी पुरेसे मते मिळाली तर त्या पक्षाचे १० उमेदवार क्रमाने निवडले जातात. जर ने सेट सदस्य राजीनामा देत असेल तर त्या यादीतील पुढील व्यक्ती त्याला बदली असते.

 

@विरेंद्र सुधा प्रदीपराव
८८८८२४४८८३


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

भारत इस्राइल मैत्रीचे महत्व

Next Article

प्रश्नमंजुषा

You may also like