पंढरपूर आणि हज यात्रा…

Author: Share:

पंढरीला नाही गेले
चुकुनिया एक वेळ !

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर ह्यांना भारताचा पाकिस्तान होण्याची वाटत असलेली भीती, सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश ह्यांच्यातील मतभेद सार्वजनिकरित्या प्रगट होण्याची अत्यंत अभूतपूर्व घटना आणि हज यात्रेचे शासकीय अबुदान बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ह्या तीन मुद्दयांचा फार सांभाळून पाठपुरावा केला पाहिजे ० हज अनुदानावरील चर्चेला राजकीय आणि धार्मिक अंग आहे ० हज यात्रेच्या निमित्ताने जगभरातील मुसलमान एकत्र जमतात ० अल्लाची आणि महंमद पैगंबराची कृपा असावी म्हणून तेथे प्रार्थना केली जाते ० इस्लामला अनन्य निष्ठा वाहिली जाते ० इस्लामच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आमरण समर्पित जीवन जगण्याची शपथ घेतली जाते ० इस्लाम आंतरराष्ट्रीय निष्ठा प्रवर्तित करणारा धर्म असून दार-उल-हर्ब आणि दार-उल-इस्लाम असे जगाचे त्याने दोन भाग केले आहेत ० जेथे इस्लामचे राज्य नाही तेथील मुसलमानांनी त्या भूमीवर सामदामदंडभेदादि सर्व उपायांचा बेधडक वापर करून इस्लामचे राज्य आणण्यासाठी युद्धमान अवस्थेत जीवन जगणे इस्लामच्या तत्वज्ञानानुसार बंधनकारक आहे ०

हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना धार्मिक प्रवचने ऐकावी लागतातच आणि त्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या कर्तव्याचीही जाणीव करून दिली जाते ० इस्लाम भूमीनिष्ठा शिकवीत नाही ० इस्लाम शांततेचा प्रसार करीत नाही ० भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात एकच अंतर आहे आणि ते म्हणजे इस्लाम असे उद्गार झिया-उल-हक्क ह्यांनी ते पाकिस्तानचे अध्यक्ष असतांना काढले आहेत ० भारतातील मुसलमानांना देशभक्त बनविण्यात मुख्य अडचण इस्लामची आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत ० भारतातील जे मुसलमान आजपर्यंत हज यात्रेला जाऊन आले त्यांनी भारतावर प्रेम करावे , भारताची जननीस्वरूपात पूजा करावी आणि भारताचा ऐहिक उत्कर्ष व्हावा म्हणून निरपेक्षपणे आपले योगदान समर्पित करावे ह्याकरिता तेथे उपदेशपर प्रवचनांचे आयोजन झाले असेल ही शक्यता कमी ० कदाचित एखादेवेळी अशी प्रवचने झालीही असतील पण त्यांचा प्रभाव भाविकांवर झाला असे दिसले नाही ०

मुसलमानांचे हिंदुसमवेत होणारे सहजीवन हज यात्रेमुळे शांतीचे आणि सुखाचे झाले असे दिसले नाही ० पंतप्रधान नेहरूंचे घनिष्ठ मित्र आणि काश्मीरच्या राजकारणातील सर्वेसर्वा शेख अब्दुल्ला एकदा हज यात्रेला गेले होते आणि तेथे त्यांनी काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या एका आंतरराष्ट्रीय कटकारस्थानात भाग घेतला होता हे आता सगळ्यांना माहीत झाले आहे ० सावरकरांच्या लंडनमधील क्रांतिकार्याचा अनुभव आल्यानंतर ब्रिटिश इतके सावध झाले की १९४७ नंतरही महाराष्ट्रातून कोणी पुढारलेल्या जातीतील तरुण मोठ्या वास्तव्यासाठी इंग्लडला गेला तर त्याची वेगळी फाईल उघडली जाऊन त्याच्यावर पाळत ठेवली जाई असे म्हटले जात असे ० आपल्याकडे मात्र हज यात्रेला जायला विशेष अनुदान देऊन सरकार मुसलमानांना वर्षानुवर्षे उत्तेजन देत असे ० हजला जाणारा प्रत्येक मुसलमान शेख अब्दुल्लाप्रमाणे देशद्रोही असतो असे म्हणायचे नाही ० पण हज यात्रेला राजकीय पैलूही आहे आणि तो भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा आहे ह्याकडे आपले दुर्लक्ष होत होते हे निश्चित ०

आता हे जे हज अनुदान बंद झाले त्यामुळे भारतात इस्लाम धोक्यात असल्याची आवई उठवून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न मुल्लामौलवी,विघटनकारी राजकीय नेते आणि समाजकंटक करतील ह्यात शंका नाही ० ह्या उद्भवणाऱ्या परिस्थितीचा जो ‘ कायदा आणि सुव्यवस्था ‘ नावाचा भाग त्याची काळजी वाहायला नरेंद्र आणि देवेंद्र ह्यांचे सरकार समर्थ आहे ० ह्या वावटळीत सर्वसामान्य मुसलमानाचे मन भरकटू नये आणि त्याचे डोके शांत राहावे म्हणून म्हणून प्रबोधन आणि संघटन क्षेत्रात काम करणाऱ्या हिंदूंनी मुसलमान समाजाशी संपर्क साधायला हवा आणि तो कधी तुटणार नाही असा वाढवत न्यायला हवा ० हिंदू धर्म तसेच इस्लाम धर्म आणि त्यांच्या शिकवणुकीचे अनुयायांवर झालेले परिणाम ह्याची चर्चा करण्याची संधी चालून आली आहे ० तिचे स्वागत व्हायला हवे ० आषाढी आणि कार्तिकी एकादशीला निघणाऱ्या पंढरपूरच्या वारीचे रहस्य मुसलमानांना समजावून सांगता येईल ०

गेली कित्येक शतके ह्या वाऱ्या वाजतगाजत निघत आहेत आणि जेथे जेथे मराठी भाषिक राहतात ते सर्व भाग ह्या ना त्या प्रकारे त्यात सामील होत आलेले आहेत ० कसल्याही अनुदानावाचून आणि प्रलोभनावाचून स्वयंस्फूर्तीने ह्या वाऱ्या निघतात ० प्रत्येकाकडे स्वतःच्या खर्चाने घेतलेले अंथरूणपांघरूण आणि खाण्याचे पदार्थ असतात ० विश्रांतीच्या आणि मुक्कामाच्या जागा ठरलेल्या असतात ० अस्वच्छता आणि रोगराई ह्यांना दूर ठेवले जाते ० लग्न झालेली आणि सासरी रमलेली मुलगी अधूनमधून माहेरी आईवडिलांना भेटायला जाते त्या भावनेने लाखो यात्रेकरू पांडुरंगाला भेटायला पंढरपूरचे प्रस्थान ठेवतात ० ते कसलीही तक्रार करीत नाहीत ० केवळ विश्वासाने त्याला भेटतात ० त्या भेटीतून त्यांना विशिष्ठ उर्जा मिळते ० ती वर्षभर पुरते ० तो आहे आणि त्याचे आपल्याकडे वात्सल्यपूर्ण लक्ष आहे इतकेच त्यांना हवे असते ० ते त्यांना वारीतून मिळते ० पूर्णपणे अराजकीय असा हा व्यक्तिमत्व विकासाचा धार्मिक उपक्रम मराठी संतांनी कित्येक शतके चालविला आहे ० सामान्य माणसाच्या नीतिमत्तेला खतपाणी ह्या वारीने घातले आहे ०

शिवराज्याभिषेकदिन ,भाद्रपदातील गणेश जयंती ,दसरा आणि दिवाळी असे उत्सव मराठी माणूस साजरे करतो ० ह्या सगळ्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्व सर्वार्थाने वेगळे आहे ० सगळ्यांपासून बाजूला होऊन आत्मशोधासाठी केलेला प्रवास म्हणजे ह्या वाऱ्या आहेत ० ते व्रत आहे ० अशा लाखो व्रतस्थांचे प्रतिवर्षी नियमितपणे आणि स्वयंशासितपणे भरणारे मेळावे हे महाराष्ट्राचे खरेखुरे वैभव आहे ० ह्या व्रतस्थांच्या नीतिमत्तेवर महाराष्ट्र उभा आहे ० ती त्यांची स्वतःची कमाई आहे ० रामदासांनी निर्माण केलेली हनुमानाची शक्तिपीठे आणि ह्या दोन वाऱ्या ह्यांचे सामर्थ्य महाराजांच्या ‘ मुद्रा भद्राय राजते ‘ ह्या घोषवाक्यावर पहारा देत उभे आहे ० शिवाजीच्या सैन्याने अफजलखानाला आणि औरंगजेबाला ह्या मातीत गाडला पण एकही मुसलमान स्त्रीकडे मान वर करून रोखून बघितले नाही ० कारण प्रत्येक पुरुषाकडे पांडुरंग म्हणून आणि स्त्रीकडे रुक्मिणी म्हणून बघण्याची शिकवण त्याला वारीत मिळालेली असते ० वारीत त्याग आहे लूट नाही ० म्हणून वारीचा आनंद निर्मळ आणि निरामय आहे ० आईच्या कुशीत शिरल्याचा तो आनंद आहे ० महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी एकदा वारी दुरून तरी बघावी ० म्हणजे त्यांना आपली शिदोरी पडशीत घालून माऊलीच्या नामाचा अखंड गजर करीत पंढरीच्या दिशेने केलेले पदभ्रमण आणि अनुदानावर केलेले हजचे पर्यटन ह्यातील फरक कळेल ० वारीत पांडुरंग आहे रुक्मिणी आहे ज्ञानेश्वर आहे तुकाराम आहे ०

हजारो संत आहेत आणि त्यांचे पसायदान संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी मागितलेले आहे ० वाटेवरच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही स्पर्श करायचा नाही असा दंडक शिवाजीच्या सैन्याला आहे ० हे हिंदुराष्ट्र आहे ही वहिवाट सिद्ध करण्यासाठी मराठ्यांनी सगळ्या भारतावर राज्य केले , त्यासाठी पानिपतावर त्यांची दीड लाख बांगडी फुटली पण केव्हाही सभ्यता त्यांना सोडून गेली नाही ० टिपू सुलतानावरील स्वारीत मराठ्यांचा सेनापती हरिपंत फडक्याला टिपूचा घाबरलेला ,लपून राहिलेला आणि बरेच दिवस उपाशी असलेला मुलगा सापडला तेव्हा त्याने सर्वप्रथम त्याच्या भोजनाची व्यवस्था केली आणि त्याला आपल्या मुलासारखे वागविले ० हा वारीचा नकळत झालेला संस्कार आहे ० महाराष्ट्राला मुसलमान जेव्हा पंढरपूरच्या वारीचे मर्म समजून घेतील तेव्हा पाकिस्तानी प्रवृत्तीचे समर्थन करण्याचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही ०
पंढरपूरची वारी धर्मांधता बिंबवीत नाही उलट ती मानवतेचे महानत्व खोलवर रुजवत असते ० ह्या प्रयत्नात पंढरपूरला नाही आलात तरी चालेल असे ती उच्चरवात सांगत असते ०

एक लोकप्रिय मराठी गाणे आहे आणि ते सणासुदीला रस्तोरस्ती लावलेल्या ध्वनिक्षेपकांवरून तसेच अनेकवेळा आकाशवाणीवरून ऐकायला मिळत असते ० त्यातल्या काही ओळी अशा आहेत : ” तुळशीमाळ घालूनि गळा ,कधी नाही कुटले टाळ , पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ ;देव्हाऱ्यात माझे देव ,त्यांनी केला प्रतिपाळ ,चरणांची त्यांच्या धूळ , रोज लावी कपाळाला ; विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला ” ० आईवडिलांची मनापासून सेवा केली आणि त्यांना काही कमी पडू दिले नाही तर त्या गडबडीत पंढरपूरला नाही आलात तरी चालेल , मीच कधीतरी तुमच्या दर्शनाला येईन असे समंजसपणे सांगणारा हिंदूंचा देव आहे ० धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षता ह्यात असा फरक आहे ० तो हिंदू विद्वानांनी आणि प्रवचनाकारांनी मुसलमान समाजाला समजून सांगितला पाहिजे ० मुसलमान समाजावर केवळ मुल्लामौलवींचा हक्क नाही तर सगळ्या हिंदू समाजाचा आहे ० उदात्त विचारांशी मुसलमान समाजाचा नित्य संपर्क येत राहील ह्याची काळजी राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने हिंदू समाजाच्या धुरिणांनी घेतली पाहिजे० हज यात्रेचे अनुदान बंद झाले ही चांगली गोष्ट झाली आता त्याची उणीव ज्ञानदानाने भरून केली पाहिजे आणि ते काम प्रबोधन क्षेत्रातील हिंदू अग्रणींनी करायचे आहे ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

भडाग्नी

Next Article

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके

You may also like