Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! प्रत्येक मनुष्याची गोपनीयता (प्रायव्हसी) हा संविधानाच्या २१व्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार!

Author: Share:

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महत्वाच्या खटल्याची सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने अतिशय महत्वाचा निर्णय देताना, प्रायव्हसी अर्थात प्रत्येकी मनुष्याच्या माहितीची गोपनीयता हा त्याचा संविधानाच्या २१व्या कलमांतर्गत मूलभूत अधिकार आहे असा निर्णय सार्वमताने दिला.

आधार विषयक केसचा विचार करताना सुरुवातीला राईट टू प्रायव्हसी अर्थात गोपनीयतेचा अधिकार हा मूभूत अधिकार आहे का हा पहिला प्रश्न न्यायालयाने विचारात घेतला. यावर हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने १९५४ मधील आठ बेंचने एमपी शर्मा केस मधील आणि सहा बेंच ने १९६२ मधील खरक सिंग केस मध्ये सुनावलेली निर्णय बदलले.

केंद्र शासनाने शासकीय योजनांचा अधिकार घेण्यासाठी आधार अत्यावश्यक करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या याचिकेवर सुनावणी चालू आहे.

सरन्यायाधीश खेहर यांनी सुनावणी सुनावताना सांगितले, गोपनीयतेचा अधिकार हे संविधानाच्या कलाम २१ मध्ये दिलेल्या सन्मानाने आयुष्य जगण्याच्या अधिकाराचा महत्वाचे अंग आहे.

७ जुलैला तीन न्ययाधीशांच्या बेंच ने हा निर्णय ५ बेंचकडे आणि १८ जुलै ला ५ न्यायाधीशांच्या बेंचने हा निर्णय ९ न्यायाधीशांच्या बेंचसाठी राखून ठेवला होता. आज त्यावर सुनावणी करण्यात आली.

हा एक ऐतिहासिक दिवस असल्याची भावना संविधान तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे केवळ आधार मधील बायोमेट्रिक डेटा वापरण्यावर निर्बंध येऊ शकतात. याविषयीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयासमोर अजून चालू आहे. मात्र एवढेच नव्हे तर कलाम ३७७ अंतर्गत होमोसेक्सच्युऍलिटीचा प्रश्नही आता प्रायव्हसी या शब्दांतर्गत येऊ शकेल काय याविषयी चाचपणी केली जाऊ शकते असे कायदेतज्ज्ञ मानत  आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलाम ६६अ अंतर्गत, सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्ट वर सरकारला व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याच्या अधिकारावरही यामुळे गदा येऊ शकते.इतका हा निर्णय ऐतिहासिक आहे.

माजी वित्तमंत्री यांनी १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्याचा अर्थ अजज अधिक व्यापक झाल्याची भावना ट्विटर द्वारे बोलून दाखवली.

Previous Article

उद्या बाजारामध्ये येणार २०० ची नवी नोट

Next Article

श्री निलमणी गणेश मंदीर भाद्रपद महागणेशोत्सवाचे यंदा २१वे वर्ष; भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

You may also like