आधुनिक हिरकणी

Author: Share:

सकाळी सकाळी वर्षाच्या पार्लरमध्ये एक बाई अत्यंत घाई घाईत त्यांच्या मुलाला घेऊन आल्या. मुलगा तापाने फणफणलेला, चेहरा एकदम मलूल झालेला, त्यांनी त्याला कडेवरून उतरवून पार्लरच्या सोफ्यावर एका कोपऱ्यात टेकवून बसवल. वर्षाच्या पार्लरच्या बाजूला दवाखाना होता. वर्षाचा असा समज झाला की दवाखाना अजून उघडलेला नसावा म्हणून बहुतेक या पार्लर मध्ये आल्या असाव्या.

पण तिचा हा समज चुकीचा ठरला. कारण असं होत कि ज्या बाई पार्लर मध्ये आल्या होत्या त्या गावातच कुठल्या तरी अॉफिस मध्ये नोकरी करत होत्या आणि मुलाला खूप ताप भरला म्हणून. वर्ग शिक्षीकेनी त्यांना फोन करून मुलाला घरी घेऊन जायला सांगितले. या बाईंनी मुलाच्या आजारपणाच कारण सांगून छान सुट्टी मिळवली.( मी छान सुट्टी का म्हणते हे तुम्हाला पुढच सगळ वाचून कळेलच) मग त्यांनी त्या मुलाला डॉक्टर कडे नेल.

आणि चक्क या सुट्टीच औचित्य साधून त्या पार्लर मध्ये आल्या. प्रथम त्यांनी. वर्षा कडून केस कापून घेतले. नंतर त्यांनी लागोपाठ फेशियल व वैक्स करून घेतल. घड्याळाकडे बघून म्हणाल्या की पटकन आयब्रो करून दया म्हणजे घरी जाऊन याला मऊ भात करून खायला घालते. बघा ना बिच्चारा कसा मलूल झालाय तापानी.

मध्येच वर्षानी विचारल याला पाणी, दूध काही देऊ का? (कारण वर्षा घरातच पार्लर चालवत होती) तश्या या माऊली म्हणाल्या ” अय्या! खरंच द्या हो पाणी याला न औषध द्यायला सांगितलय डॉक्टरांनी.” वर्षानी कोमट पाणी दिल मग या माऊलींनी त्या मुलाला औषध दिल. इतक सगळ हाेई पर्यंत हा मुलगा सोफ्याच्या एका टोकाला टेकूनच माऊलींची साैंदर्य साधना पाहात होता. मग माऊली पार्लरच बिल देताना म्हणाल्या ” अहो ताई ! मला कधी पासून हे सगळ करायच होतं पण वेळ मिळत नव्हता, आज याच्या शाळेतून फोन आला, साहेबांनी सुट्टी दिली तेव्हांच ठरवलं की आज हे सगळ केल्या शिवाय घरीच जायचं नाही. बिचाऱ्या मुळे करायला मिळाल सगळ मला. असं म्हणत माऊलींनी त्यांच्या बाळाच्या चेहऱ्यावरून प्रेमानी हात फिरवला.

खरंच दुर्दैवीच होता तो मुलगा ज्याच्या आईला मुलाच्या आजाराच्या वेळी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायच हे कळल नाही. वर्षाच्या मनात आलं जर ही बाई सुशिक्षीत आहे तर मग हिला ‘हिरकणीची गोष्ट’ माहित नसेल का? की जिने रायगडाच्या एका कठीण टोकावरून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता फक्त तिच्या बाळाला दुध पाजण्यासाठी स्वतः ला खाली झोकून दिलं आणि शिवाजी महाराजांनी तिची आठवण जगाला कायम रहावी म्हणून त्या बुरूजाला “हिरकणी बुरूज” असं नांव दिलं.

लेखिका: कीर्ती उदावंत.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

प्रश्नमंजुषा

Next Article

शिक्षेच्या ‘तीव्र’ते सोबत ‘हमी’ही वाढवायला हवी!

You may also like