दुहेरी निष्ठा: हिंदूंची आणि मुसलमानांची

Author: Share:


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज

www.facebook.com/SmartMaharashtraOnlineइंदिरा गांधींनी आणीबाणी लादली हे कृत्य लोकशाहीवाद्यांना भयंकर वाटत असेल तर ते संकट नेस्तनाबूद करण्यासाठी एकत्रितपणे लढलेल्या आणि जिंकलेल्या विरोधकांनी नंतर जे राजकारण केले ते अधिक भयंकर आहे ० भीषण आहे ० इंदिरा गांधींचा सत्ता आपल्याकडे म्हणजे नेहरू घराण्याकडे राहावी इतकाच मर्यादित उद्देश होता ० नंतर कुटील राजकारण करणाऱ्या काही विरोधकांना सत्ता नेहरू घराण्याकडे राहायला नको होती हे जेव्हढे खरे आहे तेव्हढेच हेही खरे आहे की त्यांना सत्ता आपल्याकडे घेऊन नेहरूंच्याच विचारांचे राजकारण पुढे रेटायचे होते आणि त्याकरिता त्यांनी लोकांनी निवडून दिलेले जनता पक्षाचे राज्य पाडले ० हेच लोक त्याच अवसानघातकीपणाने आज मोदींविरोधात उभे ठाकले आहेत ० मोदी हुकूमशहा बनणार आहेत आणि लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आणणार आहे असा प्रचार त्यांनी सुरु केला आहे ० पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव आणि भाजपला भूईसपाट करण्यासाठी आणीबाणीत इंदिराजींविरुद्ध शड्डू ठोकणारे हे पहेलवान राहुल गांधींशी हातमिळवणी करीत महागठबंधन साधण्याचा खटाटोप करीत आहेत ०

आणीबाणी विरोधात जे लढले त्यामध्ये संघटना काँग्रेस ,सर्वोदयी,समाजवादी आणि प्रजासमाजवादी ,दोन्ही कम्युनिस्ट पक्ष , मुसलमानांच्या काही संघटना ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ इत्यादी अनेक संस्था सामील झाल्या होत्या ० नेतृत्व जयप्रकाश नारायण ह्यांच्याकडे होते ० अनुशासित आणि कृतिप्रवण प्रचंड मनुष्यबळ, सुविहित आणि ध्येयवादी व्यवस्थापन , देशव्यापकत्व , मौखिक तरीही शीघ्र संदेशवहन, दैनंदिन कार्यक्रमामुळे संघटनात्मक रुधिराभिसरणाचा अविरत प्रवाह आणि सरसंघचालकांच्या तसेच सरकार्यवाहांच्या सोद्देश अखंड प्रवासामुळे नेता आणि अनुयायी ह्यांच्यातील एकजीव समरसता ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे लढ्याची सूत्रे हळूहळू संघाकडे एकवटली गेली आणि तसे जयप्रकाशजींनी सदहेतूपुर्वक होऊ दिले ० कारागृहात जे डांबले गेले त्या सत्याग्रहींमध्ये संघ स्वयंसेवकांचा भरणा पुष्कळच अधिक होता ० त्यात केवळ ब्राह्मण नव्हते तर सर्वजातींचे आणि पोटजातींचे स्वयंसेवक होते ०

फुल्यांची पगडी घालूनही हे मान्य करायला शरद पवारांची आडकाठी नसावी ० नानाजी देशमुख जयप्रकाशजींचे उजवे हात बनले होते ० त्यांनी संघाच्या अन्य प्रचारकांच्या सहकार्याने लढ्याची धार बोथट होऊ दिली नाही ० जयप्रकाशजींच्या मनात १९४२ चे काँग्रेसचे ‘ चले जाव ‘ आंदोलन आणि संघाचे आणीबाणी विरोधी आंदोलनातील योगदान ह्यांची तुलना नकळत होत असावी ० बेचाळीसचे आंदोलन नेतृत्वहीन ,उद्देशविहीन आणि बेशिस्त होते अशी कडवट टीका अनेकांनी केली आहे ० त्या तुलनेत संघाचे निष्कलंकत्व प्रकर्षाने त्यांना प्रभावित करते झाले असावे ० संघाचे उघडे व्यवहार त्यांना पाहायला मिळत होते ० कारागृहाबाहेर जसा आणीबाणीपूर्व काळात संघ चालत होता तसाच आणीबाणीत कारागृहातही सुरु होता ० गजाआड शाखा लागत होत्याच पण जे संघाबाहेरचे होते त्यांच्या मैत्रिभाव जागृत करण्याच्या दृष्टीने संपर्क अभियान सुरु झाले होते ० राज्यशास्राच्या अभ्यासाला धरून स्वयंसेवकांच्या जाणिवा विकसित व्हाव्या म्हणून वेगवेगळ्या समस्याप्रधान विषयांवर चर्चासत्रे झडत होती ० म्हणजे कारागृहातही संघ सुसंवाद आणि ज्ञानाधिष्ठित समाजकारण ह्यांना धरून होता ०

लोकशाही प्रणाली दृढ करण्यासाठी ह्या दोन गोष्टी आवश्यक आहेत ० संघ आपण समजतो तसा मुसलमान विरोधी नाही ; उलट एकात्मतेच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रवाहात मुसलमानांना सामावून घेण्यास तो उत्सुक आहे हे साने गुरुजींच्या संस्कारात वाढलेल्या साथींच्या लक्षात येत होते ० संघ आपण समजतो तसा दलितविरोधी नाही उलट जातीभेदविरहित दैनंदिन व्यवहारामुळे दलित आणि दलितेतर समाज ह्यांच्यात सौहार्द निर्माण होण्यात संघाला काही अडचण येत नाही हे टीकाकारांच्या लक्षात येत होते ० नव्या जनता पक्षात सामील झालेल्या अनेक घटकांमध्ये जनसंघाचे महत्व जयप्रकाशजींच्या आशीवार्दाने वाढत होते ० त्यामुळे संघविरोधी द्वेषमूलक राजकारणाची ज्यांची बिनभांडवली दुकाने बंद होत होती अशा समाजवाद्यांनी आणि कम्युनिष्टांनी दुहेरी निष्ठेचा मुद्दा उपस्थित करून मोरारजीभाईंचे सरकार अडीच वर्षात पाडले आणि आपण किती नतद्रष्ट आहोत हे सिद्ध केले ०

दुहेरी निष्ठेचा मुद्दा काय होता ? पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या सभासदांना एकाचवेळी जनता पक्ष आणि रा स्व संघ ह्यांच्यावर निष्ठा ठेवता येणार नाही असा आग्रह समाजवाद्यांनी आणि कम्युनिष्टांनी धरला ० तसे करणे अप्रामाणिकपणाचे,अनैतिकतेचे आणि विश्वासघाताचे होईल अशी भूमिका त्यांनीघेतली ० आपली दुकाने बंद होणार म्हटल्यावर त्यांनी आणीबाणीतील संघाच्या आश्वासक आणि मधुर अनुभवांकडे पाठ फिरविली ० त्यावरून त्यांचे लोकशाही प्रेम खरे होते की बेगडी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ० मुसलमानांनी आपली पहिली निष्ठा इस्लामला आणि नंतर जमेल तेव्हढी भारताला हे खिलाफत चळवळीपासून दाखवून दिले ० त्याकडे सावरकर आणि आंबेडकर हे विचारवंत आणि हिंदुमहासभा आणि रा स्व संघ ह्या संस्था ह्यांनी लक्ष वेधले पण गांधीवाद शिरोधार्य मानणाऱ्या राजकीय नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुसलमानांची धर्मांधता वाढून पाकिस्तान जन्माला आले ०

मुसलमानांविषयीचा नेहरूंचा दृष्टिकोन स्वीकारून आम्ही मोठा आकलन प्रमाद केला हे अच्युतराव पटवर्धनांनी पुढे पुस्तक लिहून मान्य केले ० बाकीच्या समाजवाद्यांना मुसलमानांची आंतरराष्ट्रीय निष्ठा जाचक वाटली नाही ० संघ हा नेहमी संविधाननिष्ठ राहिला आहे ० संविधानाला अपेक्षित असलेली लोकशाही,धर्मनिरपेक्षता ,समता ही मूल्ये निष्प्रभ होऊ द्यायची नसतील तर ह्या देशाच्या भावविश्वात हिंदूंचे स्थान अपमानित होऊन चालणार नाही अशी भूमिका संघ घेत आला आहे ० मुसलमानांना देशाचे तुकडे तुकडे व्हायला हवे आहेत हे माहीत असतांनाही त्यांचा अनुनय करण्यापेक्षा हिंदूंना जर एकात्म आणि अखंड भारत व्हायला हवा असेल तर मुसलमानांची मानसिकता त्यादृष्टीने वळविणे अपरिहार्य आहे अशी संघाची भूमिका आहे ० त्यात संविधान निष्ठाच प्रतीत होत आहे ०

स्वातंत्र्य आंदोलनात अखंड भारतावाद्यांशी काँग्रेसने शत्रुत्व केल्यामुळे मुसलमानांची धर्मांधता रोखता अली नाही ; परिणामी त्यांनी पाकिस्तान हिसकावून घेतले हे समाजवाद्यांच्या लक्षात येत नाही ०

दुसऱ्या महायुद्धाने जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देऊन गाशा गुंडाळणार होतेच ० अशावेळी इस्लाम मध्ये घुसला आणि त्याने लुटालूट करीत पाकिस्तानचा लचका तोडला ० इस्लामपुढे भारताचे स्वातंत्र्य आंदोलन निष्प्रभ ठरले ० पाकिस्तान रोखण्याची हिंमत आपल्यात नाहीं म्हणून फाळणी मान्य करा अशी गांधींनी हात जोडून काँग्रेस कार्यकारणीला विनंती केल्याचे इतिहास सांगतो ० गांधींनी हिंदूंमध्ये हिंमत हेतुतः: निर्माण केली नाहीच पण मुसलमानांचा धार्मिक अतिरेक आणि हिंसाचार वाढेल अशी शंभर विधाने केली ०

गॊळवलकर गुरुजींच्या कोणत्यातरी एका विधानाचा संघ मुसलमानविरोधी कसा आहे हे दाखविण्यासाठी संदर्भ सोडून वारंवार उल्लेख करणाऱ्या समाजवाद्यांना गांधी हिंदुविरोधी कसे आहेत हे दाखविणारे एकही विधान आठवत नाही ही शोकांतिका आहे ० आणीबाणी हटविण्यासाठी इंदिरा गांधी विरोधात लढणाऱ्या समाजवाद्यांमध्ये मुसलमानांचा फाजील अनुनय आणि हिंदुत्वाचा अतार्किक द्वेष ह्या दोन विषयात ते काँग्रेसपेक्षा वेगळे आहेत असे दाखविता येणार नाही ० देशाची अखंडता ,सार्वभौमता ,एकात्मता इत्यादी विषयात काँग्रेस आणि समाजवादी ह्यांच्यात साम्यस्थळे भरपूर आहे ० त्यांच्यातले वादस्थळ एकच आहे आणि ते त्या दोघात सत्ता कोणाकडे राहावी इतक्यापुरते मर्यादित आहे ०

काँग्रेस आणि समाजवादी ह्यांच्यावर मोहनदास गांधींचा प्रभाव आहे ० हे दोन्ही पक्ष हिंदूंना शोषक आणि मुसलमानांना शोषित समजतात ० हे उदाहरणांनी पटविता येईल ० आणीबाणीत इंदिराजींनी निवडणुका घेतल्या ० लोकसभा निवडणूक त्या हरल्या , त्यांची सत्ता गेली ० पण विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेसचेच सरकार पुन्हा आले ० जनता पक्षात पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले ० म्हणून उत्तमराव पाटील ह्यांना मुख्यमंत्री करावे असा ठराव त्यांनी मांडला ० समाजवादी नानासाहेब गोऱ्यांना हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री मान्य नव्हता ० म्हणून त्यांनी मालेगावचे समाजवादी पण धर्मांधतेत कमी नसलेले निहाल अहमद हयांचे नाव पुढे केले ० तो वाद सुटेना तेव्हा काँग्रेसने पुढे घुसून बाजी मारली ० परंतु समाजवादी स्वस्थ बसले नाहीत ० त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व मान्य करून आणि त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेसचे सरकार पाडले ० त्यानंतर दहा वर्षे पवार काँग्रेसविरोधकांसमवेत राहिले ० ह्या काळात त्यांनी भाजपशी घसट वाढवून संघाच्या मुशीत घोटविल्या गेलेल्या जनसंघाच्या काही नेत्यांनाही कार्यशैली बदलायला लावली ० कार्यकर्त्याचे महत्व कमी होऊन पैशाचे महत्व वाढले ० ध्येयवाद पातळ झाला ०

आज शिवसेनासहित महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांच्या नेत्यांचे अनभिषिक्त राजे शरद पवार आहेत ० त्यांनी पुण्याची परंपरागत पगडी फेकून देऊन ज्योतिबा फुल्यांची पगडी चढविण्याचे आवाहन समाजाला केले आहे ० त्यामागे ब्राह्मणद्वेष आहे ० तीन टक्के ब्राह्मण ९७ टक्के बहुजनसमाजाच्या पिळवणूक करीत आहेत असा सिद्धांत ब्रिटिशांनी मांडला ० तो सिद्धांत म्हणजे महाराष्ट्राचे प्रातिनिधिक मत आहे असा जहरी प्रचार पवार फुल्यांच्या नावाने करीत आहेत ०

थोडक्यात सांगायचे म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस संस्कृती विरुद्ध संघ संस्कृती असा लढा होणार आहे ० काँग्रेस संस्कृतीचा आदर्श मोहनदास गांधी आहे ० संघ संस्कृतीचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे ० काँग्रेस संस्कृतीला विघटन तर संघ संस्कृतीला संघटन हवे आहे ० आपण एकेकाळी हिंदू होतो ,आपले आणि हिंदूंचे पूर्वज एकच होते , म्हणून आपले आणि हिंदूंचे सुखद:खाचे विषय एकच असले पाहिजेत असे मुसलमानांनी मानावे इतकीच संघाची अपेक्षा आहे ० मुसलमान हे केवळ धार्मिक अल्पसंख्यांक आहेत ; राष्ट्रिक आणि भाषिक अल्पसंख्यांक नाहीत ही संघाची भूमिका आहे ०

काँग्रेस संस्कृती मुसलमानांचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करते ० ह्याचा अर्थ प्रत्येक विषयात मुसलमान हिंदूंशी फटकून वागले तर त्यात काँग्रेस संस्कृतीला काही चुकीचे वाटत नाही ० मुसलमान ज्याला अन्याय म्हणतील तो अन्याय आहे असे मानले पाहिजे आणि तो दूर करण्यासाठी हिंदूंनी आपल्या हिताचा बळी देऊनही पुढे धावले पाहिजे हा काँग्रेसचा आग्रह आहे ० असा आग्रह धरणे हे संविधानाच्या विरोधात आहे ० अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करणे ह्या परकीय मुसलमान आक्रमकांच्या ध्येयाचा निषेध न करता त्याला अनुलक्षून पूरक वर्तन करणे म्हणजे भारताची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता धोक्यात आणणे आहे ० हे कृत्य , असा विचार संविधानविरोधी आणि देशद्रोहाचा आहे ० तात्पर्य २०१९ ची निवडणूक ही देशाच्या संविधानाचे आणि सर्वोच्च मानबिंदूंचे संरक्षण करण्यासाठी होणार आहे ० लेखनमर्यादा ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: 09619436244असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज

www.facebook.com/SmartMaharashtraOnlinePrevious Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग १

Next Article

ब्राम्हणगाव (विंचूर) येथे महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शिवार फेरी व कार्यशाळांचे आयोजन

You may also like